मराठा आरक्षणासाठी काटेवाडीत ‘कॅंडल मार्च’

काटेवाडी (बारामती) – मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. तसेच राज्यभरात ठिकठिकाणी मराठा बांधव आंदोलन करत आहेत. तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काटेवाडी (ता. बारामती) येथे गावातील सर्व महिला व पुरुषांकडून काठेवाडी गावामधून कॅन्डल मार्च काढण्यात आला. सामूहिक राष्ट्रगीताने कॅंडल मार्चची सांगता करण्यात आली.
बारामती: मराठा आरक्षणासाठी काटेवाडीत ‘कॅंडल मार्च’ pic.twitter.com/9siAPiHTER
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 31, 2023
यावेळी मराठा समाज बांधवांनी मोठ्या आवाजात घोषणा दिल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे याबाबत हा कॅंडल मोर्चा काढण्यात आला. शेकडो मराठा समाजाने या कॅंडल मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मराठा समाज अशाप्रकारे आंदोलन करत राहणार असल्याचे मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले.





