बारामती : नव्याने 10 कोरोनाबाधितांची भर तर एकूण रुग्णसंख्या 287 वर
Updated On:

बारामती : बारामती शहर व तालुक्यात नवीन 10 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. बारामतीत एकूण रुग्णांची संख्या 287 एवढी झाली आहे.
काल (दि 10) कोरोनाबाधितांच्या संपर्कातील एकूण 42 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील राम गल्ली येथील 50 वर्षीय महिला, आमराई परिसरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 5 जणांचे अहवाल व देसाई इस्टेट येथील एकाचा अहवाल असे शहरातील 7 रूग्ण व गुणवडी येथील 1 महिला, पाहुणेवाडी येथील 1 रुग्ण व संगवी येथील 26 वर्षीय पुरुष असे ग्रामीण भागातील 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व बारामतीमधील रुग्णांची संख्या 287 झाली आहे.





