Barack Obama: बराक ओबामांच्या वर्षभरातील आवडत्या चित्रपटांची लिस्ट आली समोर, ‘या’ भारतीय सिनेमाचाही समावेश

Barack Obama’s Favorite Movies list of 2024 : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आपली मते आणि ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. ओबामा नेहमी वर्षाखेरीस आपल्या आवडत्या चित्रपट, गाणी व पुस्तकांची लिस्ट शेअर करत असतात. यंदा देखील त्यांनी वर्ष 2024 मध्ये त्यांना आवडलेल्या 10 चित्रपटांची लिस्ट शेअर केली आहे. विशेष म्हणजे या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर भारतीय चित्रपटाचा समावेश आहे.
बराक ओबामा यांनी शेअर केलेल्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाचा समावेश आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केले आहे.
वर्ष 2024 मधील बराक ओबामा यांचे टॉप-10 आवडते चित्रपट
बराक ओबामा यांनी ट्विट करत त्यांच्या आवडत्या चित्रपटांची लिस्ट शेअर केली आहे. यामध्ये ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’सोबतच कॉनक्लेव्ह, द पियानो लेसन, द प्रॉमिस्ड लँड, द सीड ऑफ द सॅक्रेड फिग, ड्यून: पार्ट टू, अनोरा, Dìdi, शुगरकेन आणि अ कम्प्लिट अननोन या चित्रपटांचा समावेश आहे.
Here are a few movies I’d recommend checking out this year. pic.twitter.com/UtdKmsNUE8
— Barack Obama (@BarackObama) December 20, 2024
वर्ष 2023 मध्ये देखील त्यांनी आपल्या आवडत्या चित्रपटांची माहिती दिली होती. या लिस्टमध्ये रस्टिन, लिव्ह द वर्ल्ड बिहाइंड आणि अमेरिकन सिम्फनी चित्रपटांचा समावेश होता.
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ला पुरस्कार
बराक ओबामा यांच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ या चित्रपटाला कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॉर्ड (ग्रांप्री) मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केले आहे. तर चित्रपटात छाया कदम, कानू कुसरुती आणि दिव्या प्रभा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.





