नवी दिल्ली – दुसर्या तिमाहीत विविध कंपन्यांचा नफा समाधानकारक नव्हता. त्याचा परिणाम शेअर बाजारावर झाला होता. मात्र आता तिसर्या तिमाहित सरकारी बँकांचा नफा तब्बल 18 टक्क्यांनी वाढून 52,603 कोटी रुपयावर गेला आहे. यामुळे आगामी काळात बँकांची परिस्थिती आणि बळकट होईल आणि बँका खासगी क्षेत्राला कर्ज पुरवठा करू शकतील असे समजले जात आहे. या घडामोडीमुळे सोमवारी बँकांच्या शेअरची बरीच खरेदी होऊन बँकिंग क्षेत्राचा निर्देशांक वधारला होता. नोंदलेल्या सर्व 12 सरकारी बँकांचा नफा गेल्या वर्षीच्या या तिमाहीत 44,473 कोटी रुपये इतका होता. त्यामध्ये या तिमाहीत 8,130 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. बारा बँकांच्या एकूण नफ्यात देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचे योगदान 40% असून या बँकेला तिसर्या तिमाहीत झालेला नफा 24 टक्क्यांनी वाढून 52,603 कोटी रुपये इतका झाला. हेही वाचा – शेअर बाजारात मोठी उसळी; गुंतवणूकदारांची एकाच दिवसात 6 लाख कोटींची कमाई चेन्नई स्थिती इंडियन ओव्हरसिज बँकेला या तिमाहीत झालेला नफा 56 टक्क्यांनी वाढून 1,365 कोटी रुपये इतका झाला आहे. सेंट्रल बँकेला झालेला नफा 32 टक्क्यांनी वाढून 1,263 कोटी रुपयांवर गेला आहे. या 12 बँकापैकी बडोदा बँक, युनियन बँक, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया या बँकांना झालेला नफा 10% पेक्षा कमी झाला आहे. मात्र इतर बँकांचा नफा जास्त प्रमाणात वाढला आहे. जास्त नफा कमवलेल्या बँकांमध्ये स्टेट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक या बँकांचा समावेश आहे. या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्राचा नफा 27 टक्क्यांनी तर कॅनरा बँकेचा नफा 26 टक्क्यांनी वाढला आहे. पंजाब अँड सिंध बँकेला झालेला नफा 19 टक्क्यांनी, युको बँकेला झालेला नफा 16 टक्क्यांनी, पंजाब नॅशनल बँकेला झालेला नफा 13 टक्क्यांनी वाढला आहे. हेही वाचा – ZP निवडणूकीत भाजपच मोठा पक्ष ते शरद पवार रुग्णालयात दाखल, वाचा आजच्या टाॅप बातम्या अशा परिस्थितीत चालू आर्थिक वर्षात सरकारी बँकांचा एकूण नफा दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता असल्याचे वित्तीय सेवा सचिव एम नागराजू यांनी सांगितले. चालू वर्षांमध्ये बँकांचा कर्ज पुरवठा 12 टक्क्यांनी वाढला आहे. ही चांगली बाब आहे.ठेवीनचा दर दहा टक्क्यांनी वाढला आहे.