बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, 500 जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

Bank of Baroda Recruitment | तुम्ही जर बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदाने (BOB) ह्युमन रिसोर्स विभागात मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे बँक ऑफ बडोदाच्या विविध शाखांमध्ये एकूण 518 पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरतीसाठी 19 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवारांना 11 मार्च 2025 पर्यंत अर्ज करता येईल. इच्छुक व पात्र उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करू शकतात.
पात्रता
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 22 ते 43 वर्षांपर्यंत असणे गरजेचे आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल. तसेच, प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रताही वेगळी आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहावी.
अर्ज शुल्क व प्रक्रिया
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in ला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर होम पेजवरील करिअर टॅबवर क्लिक करा.
- मग Current Openings टॅबवर क्लिक करावे.
- त्यानंतर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.
- आता Click here for New Registration वर क्लिक करून तुमची माहिती भरा.
- त्यानंतर अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. त्यानंतर अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
- जनरल, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 600 रुपये, एससी, एसटी, PWD आणि महिला उमेदवारांना अर्जासाठी 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, ग्रुप डिस्कशन किंवा वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर केली जाईल.





