सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण, बँक ऑफ बडोदामध्ये निघाली मोठी भरती; पाहा माहिती

Bank of Baroda SO Recruitment 2025 | तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. बँक ऑफ बडोदाने 518 जागांसाठीची भरती जाहीर केली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या 518 जागा भरल्या जाणार आहेत.
या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 मार्च होती. मात्र, आता अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली आहे. आता इच्छुक व पात्र उमेदवार 21 मार्च 2025 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवार bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.
पात्रता
स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 22 ते 43 वर्ष असणे गरजेचे आहे. प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा वेगवेगळी आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल. तसेच, पदांनुसार शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी आहे.
अर्ज शुल्क
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 600 रुपये आणि एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 100 रुपये भरावे लागतील.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- यानंतर तुम्हाला होम पेजवर दिलेल्या करिअर टॅबवर क्लिक करावे लागेल.
- आता करंट ओपनिंग्ज टॅबवर क्लिक करा.
- पुढे Click here for New Registration वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती भरावी लागेल.
- तुमची माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे. त्यानंतर अर्ज शुल्क जमा करून फॉर्म सबमिट करा.
- त्यानंतर अर्ज डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या.

