Champions Trophy : बांगलादेशाने नाणेफेक जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय; टीम इंडिया रोखू शकेल धावांचे आव्हान ?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॅाफी २०२५ स्पर्धेला कालपासून सुरूवात झाली आहे. या स्पर्धेचे आयोजन दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर करण्यात आले आहे. आज या स्पर्धेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. बांगलादेश विरुद्ध भारत असा हा सामना असणार आहे. हे दोन्ही संघ ए ग्रममध्ये आहेत. सामन्या आधी टॅास करण्यात आला असून बांगलादेशाच्या बाजून नाणेफेकीचा कौल लागला आहे. बांगलादेशाच्या टीमने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
टॉस जिंकलो असतो तरी फिल्डिंग करण्याचाच निर्णय घेतला असता, असं रोहित शर्माने टॉसनंतर म्हटलं आहे. टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी याचं कमबॅक झाले आहे. विकेटकीपर म्हणून केएल राहुल याला संधी देण्यात आली आहे, यामुळे ऋषभ पंतला बाहेर बसाव लागले आहे. आतापर्यंत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॅाफीत एकूण २९ सामने खेळले आहेत. भारताने यापैकी १८ सामने जिंकले आहे. दरम्यान टीम इंडियाने दुबईत एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. टीम इंडियाने या मैदानात खेळलेल्या 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना टाय झाला आहे.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तांझीद हसन, सौम्या सरकार, तॉहिद हृदॉय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, जाकेर अली, रिशाद हुसेन, तन्झीम हसन साकिब, तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.





