Shoaib Akhtar : भारताच्या दमदार विजयानंतर शोएब अख्तरचा व्हीडिओ व्हायरल; केले गंभीर आरोप, काय म्हणाला एकदा पाहाच….

IND vs NZ India | Champions Trophy | Shoaib Akhtar : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला चार विकेट्सने पराभूत करून विजेतेपद पटकावले आहे. हे भारताचे हे आयसीसी स्पर्धेतील सलग दुसरे जेतेपद आहे.
यापूर्वी २०२४ मध्ये टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर भारताने १२ वर्षांनंतर तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारताने २५२ धावांचे लक्ष्य ४९ षटकांत ६ विकेट्स गमावून पूर्ण केले. भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले आहे.
ही भारताची सातवी आयसीसी ट्रॉफी आहे. यापूर्वी, संघाने १९८३ आणि २०११ चा एकदिवसीय विश्वचषक, २००७ आणि २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि २००२, २०१३ आणि २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. भारतीय संघाने सलग पाच सामने जिंकत चॅम्पियन्स ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरले आहे.
पाकिस्तानकडे या चॅम्पियन ट्रॉफीचं यजमानपद होतं. अंतिम सामन्यातील विजयानंतर बक्षिस वितरण करण्यात आलं. उपविजेता न्यूझीलंडच्या खेळाडूंना तसेच पंचांना स्मृतीचिन्ह देण्यात आलं. तसेच भारतीय खेळाडूंना मेडल देण्यात आले.
या बक्षिस वितरण समारंभात आयसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी उपस्थित होते. तर, पाकिस्तानकडून सामन्यााला आणि बक्षिस वितरणासाठी पाकिस्तानकडून एकही सदस्य का नव्हता? याची चर्चा सगळीकडे होताना दिसत आहे.
अश्यातच, आता पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर ट्विट करत यावर भाष्य केलं आहे. शोएबने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो म्हणाला, “भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. मी या सामन्यात एक विचित्र गोष्ट पाहिली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा एकही नुमाइंदा (सदस्य) इथे उपस्थित नव्हता.
This is literally beyond my understanding.
How can this be done???#championstrophy2025 pic.twitter.com/CPIUgevFj9— Shoaib Akhtar (@shoaib100mph) March 9, 2025
पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान होता. त्यानंतरही पाकिस्तानचा एकही सदस्य नव्हता. ही गोष्ट माझ्या समजण्या पलीकडील आहे की पाकिस्तानकडून प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि ट्रॉफी देण्यासाठी कुणी का आला नाही?
ही जागतिक स्तरावरील स्पर्धा होती. इथे तुम्हाला असायला हवं होतं. मात्र त्यानंतरही यजमानांकडून एकही सदस्य नव्हता. यजमान या नात्याने संबंधित क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी आणि सदस्य महत्त्वाच्या सामन्याला हजर असतात.
तसेच इतर क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी उपस्थित असतात. भारत-पाकिस्तानचे संबंध चांगले नाहीत. मात्र त्यानंतरही 5 मार्चला बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्यासाठी लाहोरमध्ये उपस्थित होते.
मात्र अंतिम सामन्यात यजमान पीसीबीचे पदाधिकारी आणि सदस्यांपैकी कुणीही उपस्थित न राहिल्याने अख्तरने आश्चर्य व्यक्त केलंय. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकरी देखील यावर प्रतिक्रिया देत आहे.





