T20 World Cup 2024 : श्रीलंकेला हरवून बांगलादेशची विजयी सुरुवात, लिटन-तौहीदने संकटमोचक बनून केला उलटफेर…

T20 World Cup 2024 (BAN vs SL) : अमेरिका आणि वेस्ट इंडीज यांनी आयोजित केलेल्या टी-20 विश्वचषक 2024 मधील 15 वा सामना श्रीलंकेविरुद्ध दोन गडी राखून जिंकून बांगलादेशने चालू स्पर्धेत मोठा उलटफेर निर्माण केला. ड गटातील रोमहर्षक लढतीत विजय मिळवत बांगलादेशने सुपर-8 मधील दावेदारी मजबूत केली आहे. सध्या नजमुल हसन शांतोचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. यासोबतच श्रीलंकेने सलग दुसऱ्या सामन्यातील पराभवासह शेवटच्या स्थानावर पोहोचले आहे. याआधी त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.
टी-20 विश्वकरंडकात बांगलादेशचा श्रीलंकेविरुद्धचा हा पहिला विजय आहे. याआधी दोन सामने झाले होते, जे दोन्ही सामने श्रीलंकेने जिंकले होते. डॅलसच्या ग्रँड प्रेरी स्टेडियमवर बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 9 गडी गमावून 124 धावा केल्या आणि बांगलादेशला 125 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात बांगलादेशने 19 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य गाठले.
Bangladesh 🆚 Sri Lanka | ICC Men’s T20 World Cup
Bangladesh won by 2 wickets 👏 🇧🇩#BCB #Cricket #BANvSL #T20WorldCup pic.twitter.com/SryD7227DL— Bangladesh Cricket (@BCBtigers) June 8, 2024
तत्पूर्वी, श्रीलंकेने बांगलादेशला 125 धावांचे लक्ष्य दिले होते. श्रीलंकेकडून सलामीवीर पाथुम निसांकाने सर्वाधिक 47 धावा केल्या. त्याच्याशिवाय धनंजय डी सिल्वाने 21 आणि चरित असलंकाने 19 धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमान आणि रिशाद हुसेन यांनी 3-3 बळी घेतले. तस्किन अहमदने 2 बळी घेतले. तंजीम हसन साकिबला 1 बळी मिळाला.
T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानचा मोठा उलटफेर, न्यूझीलंडला हरवून रचला इतिहास..
तौहीद हृदोयच्या सर्वाधिक धावा…
लक्ष्याचा पाठलाग करताना लिटन दास आणि तौहीद हृदय हे बांगलादेशसाठी संकटमोचक ठरले. बांगलादेशकडून तौहीद हृदोयने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 20 चेंडूत 40 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय लिटन दासने 36 आणि महमुदुल्लाहने नाबाद 16 धावा केल्या. श्रीलंकेकडून नुवान तुषाराने 4 बळी घेतले. वानिंदू हसरंगाने 2 बळी घेतले. मथिश पाथिराना आणि वानिंदू हसरंगा यांनी 1-1 विकेट घेतली.





