‘…तर आम्ही तुमच्याविरुद्ध जगभरातील देशांकडून पाठिंबा मागू…’ ; बांगलादेशची पुन्हा भारताला धमकी

Bangladesh Threaten India । बांगलादेशच्या अंतरिम सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतातून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार असून गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय हस्तक्षेपाची मागणीदेखील करतील असे म्हणत पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. ढाकास्थित एका वृत्तपत्रानुसार, अंतरिम सरकारमधील कायदेशीर बाबींचे सल्लागार आसिफ नजरुल यांनी याठिकाणी सचिवालयात माध्यमांना ही माहिती दिली. यांविषयी बोलताना त्यांनी,”जर भारताने हसीनाला परत पाठवण्यास नकार दिला तर ते बांगलादेश आणि भारत यांच्यातील प्रत्यार्पण कराराचे उल्लंघन ठरेल.” असे म्हटले.
गेल्या वर्षी ५ ऑगस्टपासून शेख हसीना भारतात राहत आहेत. १६ वर्षांचे अवामी लीग (एएल) सरकार एका मोठ्या विद्यार्थी चळवळीच्या दबावाखाली कोसळल्यानंतर त्यांनी भारतात शरणागती पत्कारली. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (ICT) हसीना आणि अनेक माजी कॅबिनेट मंत्री, सल्लागार, लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांविरुद्ध “मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहार” यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे.
बांग्लादेशकडून शेख हसिना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी Bangladesh Threaten India ।
बांगलादेशने गेल्या वर्षी भारताला एक राजनैतिक पत्र पाठवून हसीनाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती. नजरुल म्हणाले, “आम्ही प्रत्यार्पणासाठी पत्र लिहिले आहे. जर भारताने शेख हसीनाचे प्रत्यार्पण केले नाही तर ते बांगलादेश आणि भारत यांच्यातील प्रत्यार्पण कराराचे स्पष्ट उल्लंघन असेल.
गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय मदत घेतली जाईल Bangladesh Threaten India ।
अशा परिस्थितीत परराष्ट्र मंत्रालय आंतरराष्ट्रीय समुदायासमोर हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल, असे त्यांनी सांगितले. कायदेशीर सल्लागार म्हणाले की परराष्ट्र मंत्रालय देखील प्रयत्न करत आहे आणि आधीच ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नजरुल म्हणाले, “आम्ही आमच्या परीने सर्वकाही करत आहोत. शेख हसीना यांना परत आणण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न सुरू ठेवेल. गरज पडल्यास आंतरराष्ट्रीय मदत घेतली जाईल.”
भारत-बांगलादेश प्रत्यार्पण कराराच्या तरतुदींनुसार, जर गुन्हे ‘राजकीय स्वरूपाचे’ असतील तर प्रत्यार्पण नाकारले जाऊ शकते. दुसऱ्या तरतुदीत असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीला चार महिने किंवा त्याहून अधिक काळ तुरुंगवास किंवा इतर प्रकारच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली नसेल तर त्याचे प्रत्यार्पण करता येणार नाही.





