BAN W vs PAK W : पाकिस्तानचा दारुण पराभव! बांगलादेशने सात विकेट्सने मारली बाजी, गुणतालिकेत पटकावले दुसरे स्थान

BAN W vs PAK W Bangladesh beat Pakistan : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ चा तिसरा सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात पाकिस्तान आणि बांगलादेश आमनेसामने आले होते, ज्यामुळे चाहत्यांना या सामन्यात रोमांचाची अपेक्षा होती, मात्र पाकिस्तानी संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. परिणामी, त्यांना सात विकेट्सनी एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला.
बांगलादेशने विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पटकावले दुसरे स्थान –
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्यांचा संघ १२९ धावांवर गारद झाला. त्यानंतर बांगलादेशने हे लक्ष्य अवघ्या ३१.१ षटकांत फक्त तीन विकेट्स गमावून गाठले आणि पॉइंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडले. आत्तापर्यंत आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये सहा संघांनी प्रत्येकी एक सामना खेळला आहे. पॉइंट्स टेबलनुसार, गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर आहे, तर बांगलादेशचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड अंतिम दोन स्थानांवर –
Bangladesh’s 2 wins ever at the World Cup
2022 vs Pakistan ✅
2025 vs Pakistan ✅Excellent result for them! #PAKvBAN #PAKvsBAN #BANvPAK #BANvsPAK
— Cricketism (@MidnightMusinng) October 2, 2025
भारतीय महिला संघ तिसऱ्या स्थानावर सरसावला आहे. तिन्ही संघांकडे प्रत्येकी दोन-दोन गुण आहेत, पण नेट रन रेट येथे निर्णायक भूमिका बजावत आहे.ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट १.७८० असून, बांगलादेशचा १.६२३ आणि भारतीय महिलांचा १.२५५ आहे. टूर्नामेंट प्रगतीप्रमाणे, सर्व संघांसाठी टॉप-४ मध्ये स्थान मिळवण्यासाठी नेट रन रेट महत्त्वाचा ठरणार आहे. महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघांनी अद्याप एकही सामना खेळला नाही.
हेही वाचा – Abhishek Sharma : शुबमन गिलमुळे अभिषेक संघातून होणार होता बाहेर; स्वत: सागिंतला ‘तो’ किस्सा, पाहा VIDEO
पॉइंट्स टेबलमध्ये अंतिम स्थानावर न्यूझीलंडचा संघ आहे, ज्यांना त्यांच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. सातव्या स्थानावर पाकिस्तानी संघ आहे, ज्यांच्यासाठी टूर्नामेंटमधील पुढील वाटचाल आता अधिक कठीण झाली आहे. सहाव्या स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे. पाकिस्तानी महिलांना आता आपला दुसरा सामना ५ ऑक्टोबरला भारतीय महिला संघाविरुद्ध खेळायचा आहे, जो कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होईल.





