Abhishek Sharma : शुबमन गिलमुळे अभिषेक संघातून होणार होता बाहेर; स्वत: सागिंतला ‘तो’ किस्सा, पाहा VIDEO

Abhishek Sharma on Shubman Gill : आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेत त्याने 314 धावा करत ‘मॅन ऑफ द टूर्नामेंट’ हा मानाचा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे, या स्पर्धेत त्याला त्याचा बालपणीचा मित्र आणि भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याच्यासोबत प्रथमच सलामीला खेळण्याची संधी मिळाली. आता त्याने शुबमन गिलसोबतचा एक खास किस्सा सांगितला, ज्यामुळे तो संघातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता.
शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा या जोडीने बहुतांश सामन्यांमध्ये संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दरम्यान, अभिषेकने ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या शोमध्ये गौरव कपूर यांच्याशी संवाद साधताना शुबमन गिलसोबतच्या अंडर-16 काळातील एक मजेदार किस्सा सांगितला, ज्यामुळे तो संघातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. हा किस्सा सांगताना अभिषेकने शुबमनच्या एका खास कौशल्याची प्रशंसा केली, ज्यामुळे तो नेहमीच खोड्या करताना पकडला जाण्यापासून वाचला.
गिल कधीच खोड्या करताना पकडला जायचा नाही –
“Abhishek Sharma shares a mischievous story about Shubman Gill!” pic.twitter.com/hDhu9kPGdk
— GillTheWill (@GillTheWill77) October 2, 2025
अभिषेकने सांगितले की, अंडर-16 मॅचदरम्यान धर्मशाला येथे हिमाचल, दिल्ली आणि पंजाबच्या खेळाडूंमध्ये एक मजेदार घटना घडली. त्यांचे खेळाचे मैदान हॉटेलपासून फक्त 500 मीटर अंतरावर होते, तरीही त्यांना बसने मैदानावर नेले जायचे. बस ड्रायव्हर गाणी बंद करायचा, तेव्हा खेळाडू पंजाबी गाणी मोठ्या आवाजात लावायचे. यावरून ड्रायव्हरशी त्यांची बाचाबाची व्हायची, आणि यात शुभमन गिल आघाडीवर असायचा.
एकदा सर्व ड्रायव्हरांनी कोचकडे तक्रार केली की, “तुमची मुलं किती उद्धट आहेत.” यानंतर कोचने अभिषेक, प्रभसिमरन आणि गिलसह 4-5 खेळाडूंना रांगेत उभे केले. ड्रायव्हरने सर्वांना ओळखले, पण गिलबद्दल म्हणाला, “हा नव्हता.” यामुळे कोचने अभिषेकसह चार खेळाडूंना बाहेर काढले आणि त्यांना घरी पाठवण्यासाठी पत्रावर सही घेण्यास सांगितले. अभिषेकने यावर नाराजी व्यक्त करताना विचारले, “गिलला का पकडले नाही? कारण तोच यामागे होता.”
हेही वाचा – IND vs WI : मोहम्मद सिराजचा ऐतिहासिक पराक्रम! स्टार्कला मागे टाकत ठरला जगातील पहिला गोलंदाज
शुबमन गिलच्या छुप्या प्रतिभेचा खुलासा –
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलने आपल्या नेतृत्वाखाली शानदार कामगिरी केली आहे. अभिषेकने या मुलाखतीत गिलच्या एका छुप्या प्रतिभेचा खुलासा केला. तो म्हणाला, “शुभमन आपल्या चेहऱ्यावरील हावभाव तात्काळ बदलण्यात माहीर आहे. तो हसत असताना क्षणात गंभीर होऊ शकतो. ही गोष्ट पंजाबी लोकांमध्ये सहसा आढळत नाही. तो असा निरागस चेहरा करतो की, कुणालाही त्याच्यावर संशय येत नाही.”





