Test Cricket : कागिसो रबाडाने रचला इतिहास, ‘या’ बाबतीत वकार-स्टेन-डोनाल्ड सारख्या दिग्गजांना टाकले मागे….

Kagiso Rabada Creates History : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने ढाका येथे बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इतिहास रचला आहे. त्याने पहिल्या डावात तीन विकेट्स घेतल्या, नाणेफेक गमावल्यानंतर पाहुण्या बांगलादेशला केवळ 106 धावांत गुंडाळण्यास मदत केली. या वेगवान गोलंदाजाने पहिल्याच सत्रात मुशफिकर रहीमला बाद करून कारकिर्दीतील 300 बळीही पूर्ण केले.
यासह दक्षिण आफ्रिका व बांगलादेश दरम्यान सुरु असलेल्या पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज कासिगो रबाडाने सर्वात कमी चेंडूत 300 बळींची नोंद करताना आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन व पाकिस्तानच्या वकार युनूस यांना मागे टाकले आहे.
Kagiso Rabada gets his 300th test wicket! ⚡
Congratulations to Kagiso Rabada on reaching a monumental milestone, delivered at 13.5 overs in today’s Test against Bangladesh! 👏🏏🇿🇦
Your dedication to the craft and game-changing pace continues to inspire the nation.
Here’s to… pic.twitter.com/5b6IlTOfQ1
— Proteas Men (@ProteasMenCSA) October 21, 2024
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसने 12,602 चेंडूत 300 कसोटी बळी पूर्ण केले होते, त्यामुळे तो या यादीमध्ये अव्वल स्थानी होता. मात्र रबाडाने 11,817 चेंडूंतच 300 बळींचा टप्पा पार करताना या यादीत आता अव्वल स्थान मिळविले आहे. दक्षिण आफ्रिका संघाच्या डेल स्टेनने यापूर्वी 12,605 चेंडूत 300 बळी टिपले होते. चौथ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा अॅलन डोनाल्ड असून त्याने 13,672 चेंडूत ही किमया केली होती.
300 कसोटी बळी पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी चेंडू घेणारा खेळाडू
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) – 11817 चेंडू
वकार युनूस (पाकिस्तान) – 12602 चेंडू
डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका) – 12605 चेंडू
ॲलन डोनाल्ड (दक्षिण आफ्रिका) – 13672 चेंडू
माल्कम मार्शल (वेस्ट इंडीज) – 13728 चेंडू
कासिगो रबाडा हा क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने आतापर्यंत 65 कसोटी, 101 एकदिवसीय व 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. रबाडाने कसोटीमध्ये 302, एकदिवसीयमध्ये 157 तर टी-20 मध्ये 71 बळी नोंदविले आहेत.
Ranji Trophy 2024/25 : चेतेश्वर पुजारानं पुन्हा गाजवलं मैदान, द्विशतक झळकावत रचली विक्रमांची मालिका…
वकार युनूसला टाकलं मागे…
कागिसो रबाडाने 65व्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी पांढऱ्या जर्सीमध्ये 300 बळी पूर्ण केले आणि या प्रकरणात त्याने पाकिस्तानच्या वकार युनूसच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे, तो महान अनिल कुंबळेच्याही पुढे गेला आहे, ज्याने आपल्या 66व्या कसोटी सामन्यात 300वी कसोटी विकेट घेतली होती. कसोटी सामन्यांमध्ये 300 विकेट्स घेण्याचा आकडा पाहिला तर तो संयुक्त 10 वा सर्वात वेगवान खेळाडू ठरला आहे.





