BAN vs SA : ढाक्यातील सामन्यात हाणामारी! ‘जेंटलमॅन गेम’ला काळीमा, VIDEO व्हायरल

BAN vs SA Bangladesh-South Africa Emerging Teams Brawl : ढाका येथे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेच्या उदयोन्मुख संघांमधील चार दिवसांच्या सामन्यादरम्यान मैदानावर जे काही घडले, त्याने ‘जेंटलमॅन गेम्स’ची लाज काढली. या सामन्यादरम्यान खेळाडूंमधील वाद इतका वाढला की त्यातून हाणामारी झाली. प्रथम बांगलादेशचा गोलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज यांच्यात वाद झाला, नंतर हे प्रकरण एकमेकांवर हात उचलण्यापर्यंत गेले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा वाद बांगलादेशचा २२ वर्षीय फलंदाज रिपन मंडल आणि दक्षिण आफ्रिकेचा २९ वर्षीय गोलंदाज त्शेपो न्तुली यांच्यात झाला. दोघांमध्ये वाद झाला आणि नंतर दोघेही एकमेकांशी भिडले. सध्या या संदर्भात कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही. पंच लवकरच यावर आपला अहवाल सादर करू शकतात.
A heated moment between South African and Bangladesh emerging team. pic.twitter.com/OYFG1ycsMa
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 29, 2025
काय आहे संपूर्ण प्रकरण?
Tshepo Ntuli got into a scuffle with Ripon Mondol during a four-day match between Bangladesh Emerging Team and South Africa Emerging Team in Dhaka on Wednesday pic.twitter.com/PcJG1522K9
— Krishan Kumar 🇮🇳 (@krishanofficial) May 29, 2025
ही घटना घडली जेव्हा रिपनने एन्टुलीच्या चेंडूवर स्ट्रेटला षटकार मारला. यानंतर, जेव्हा तो त्याचा सहकारी फलंदाज मेहदी हसनकडे जात होता, तेव्हा त्याची नजरानजर एन्टुलीशी झाली. त्यानंतर एन्टुलीने रागाने त्याच्याकडे धाव घेतली. दोन्ही खेळाडूंनी प्रथम एकमेकांना ढकलले, नंतर एन्टुलीने रिपनचे हेल्मेट ओढले.
हेही वाचा – French Open 2025 : अल्काराझचे शानदार पुनरागमन, बोपण्णा-बालाजी जोडीची विजयी सलामी!
क्रिकइन्फोच्या मते, सामनाधिकारी या घटनेची तक्रार बीसीबी (बांगलादेश क्रिकेट बोर्ड) आणि सीएसए (क्रिकेट दक्षिण आफ्रिका) या दोघांनाही करतील, जे या प्रकरणात कारवाई करतील. विशेषतः हा दौऱ्यातील शेवटचा सामना असल्याने हा चार दिवसांचा सामना दक्षिण आफ्रिका इमर्जिंग संघाच्या दौऱ्यातील दुसरा आणि शेवटचा सामना आहे. त्यांनी एकदिवसीय मालिका २-१ ने गमावली, तर चितगावमध्ये पहिला चार दिवसांचा सामना अनिर्णित राहिला.





