#BANvsIND । शुबमन, पुजाराचा शतकीय धमाका; बांगलादेशासमोर बलाढ्य लक्ष्य

BAN vs IND – भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळाचा शेवट झाला. २ सामान्यांच्या मालिकेतील या पहिल्या सामन्यावर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. या सामन्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ शिल्लक आहे. त्यामुळे बांगलादेशला या सामन्यात भारताने दिलेल्या बलाढ्य लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून सामना जिंकावा लागेल. मात्र हे विचार करण्याएवढे शक्य नाही, कारण समोर भारतीय संघाची दमदार गोलंदाजी आहे. त्यामुळे हा सामना भारताने जिंकलाय असेच गृहीत धरले जात आहे.
“आई उद्या माझी मॅच पाहायला ये, दुसऱ्या दिवशी सकाळीच झाले निधन”, खेळाडूने सांगितली भावनिक घटना
सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा बांगलादेश ८ गडी गमावून १३३ धावांवर होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाला १५० धावांवरच रोखले. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने दमदार अंदाजात फलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या डावात मिळालेल्या २५४ धावांच्या आघाडीच्या बळावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात २ गडी गमावून २५८ धावांवर डाव घोषित करत यजमान संघाला ५१३ धावांचे बलाढ्य लक्ष्य ठेवले.
दुसऱ्या दिवसाच्या ( BAN vs IND ) खेळादरम्यान भारतीय संघाचे फलंदाज चांगलेच दिमाखात खेळताना दिसले. कर्णधार केएल राहुल २३ धावांवरच लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी जबरदस्त खेळ करत मोठी भागीदारी रचली. शुबमनने १५२ चेंडूंचा सामना करत ११० धावांची खेळी केली. पुजाराने १३० चेंडूंचा सामना करत १०२ धावा फाटकावल्या आणि आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद शतक ठोकले. विराट कोहलीने २९ चेंडूत १९ धावांचे योगदान दिले. यानंतर भारताकडून आपला डाव घोषित करण्यात आला.
That’s Stumps on Day 3 of the first #BANvIND Test!
Bangladesh move to 42/0 after #TeamIndia secured a 512-run lead!
We will be back for Day 4 action tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/CVZ44NpS5m pic.twitter.com/scqMCXxlG2
— BCCI (@BCCI) December 16, 2022
बांगलादेशने दुसऱ्या डावात फलंदाजीत सावध सुरुवात केली आहे. त्यांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही गडी न गमावता ४२ धावा केल्या आहेत. सलामीला नजमुल हुसेन शांतो २५ धावा आणि झाकीर हसन १७ धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे आता बांगलादेशला विजयासाठी अजूनही ४७१ धावांची गरज आहे. आणखी दोन दिवसांचा खेळ शिल्लक असल्याने यजमानांसाठी हा सामना रद्द करणे किंवा जिंकणे जवळजवळ अशक्य आहे.





