#BANvsIND | टीम इंडियाचे ४ गडी OUT; मात्र रोहितच्या खेळण्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह!

ढाका – भारतीय संघासाठी बांगलादेशविरुद्धचा आजचा ( BAN vs IND ) दुसरा एकदिवसीय सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण ३ सामन्यांच्या या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला सामन्यात विजय मिळवून १-१ अशी बरोबरी करण्याची संधी आहे. मात्र सध्या भारतीय संघाचा विजय अवघड वाटत आहे. कारण दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला भारतीय संघाची वरच्या फळीतील फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरले. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माला पहिल्या डावात क्षेत्ररक्षणावेळी हाताला दुखापत झाल्याने त्याचे फलंदाजीसाठी मैदानात उतरणे अजूनही स्पष्ट नाही.
#BANvsIND | रोहित शर्माला दुखापत; विराट अन् धवनही OUT, टीम इंडिया अडचणीत!
बांगलादेशने दिलेल्या २७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे वरच्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर नंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी डावाला सावरले आहे. अय्यर आपले अर्धशतक पूर्ण करत ५४ धावांवर खेळत आहे तर २ षटकारांच्या साहाय्याने अक्षर पटेल २२ धावांवर आहे. दोघांनी मिळून ४९ चेंडूत ५७ धावांची भागीदारी रचली आहे. मात्र भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल तर या दोन फलंदाजांना यापेक्षा मोठ्या खेळी खेळाव्या लागणार आहेत.
#BANvsIND | रोहित शर्माला दुखापत; विराट अन् धवनही OUT, टीम इंडिया अडचणीत!
सामन्यांच्या ( BAN vs IND ) पहिल्या डावात क्षेत्ररक्षणावेळी रोहित शर्माच्या हाताला झेल पकडताना दुखापत झाली. त्यानंतर त्याला असह्य वाटत असल्याने मेडिकल स्टाफने मैदानाबाहेर नेले. ड्रेसिंग रूममध्ये गेल्यानंतर रोहित शर्माची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. त्यामुळे तो आता फलंदाजी करणार की नाही याबाबत अजूनही कोणतीही माहिती आलेली नाही. रोहितला दुखापत झाल्यानंतर बीसीसीआयने एक ट्विट केले होते की, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात जेव्हा रोहित शर्मा क्षेत्ररक्षण करत होता, तेव्हा त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. रोहित शर्माच्या दुखापतीवर आता भारतीय संघाची मेडिकल टीम लक्ष ठेवून आहे”.





