Police Transfers : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सहा निरिक्षकांच्या बदल्या
Police Transfers : पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आदेश

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सहा निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सोमवारी (२९ जून) रात्री दिले.
शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांची सहायक पोलीस आयुक्त पदावर बढतीने बदली झाली. त्यांच्या जागी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेत कार्यरत असलेले अरविंद पवार यांच्याकडे बावधन तर रुपाली बोबडे यांच्याकडे पिंपरी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांची वाकड पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांना दिघी पोलीस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी हिंजवडी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Pimpri News: महापालिका आयुक्तांची उधळपट्टी चर्चेत; अलिशान वाहनानंतर आता कार्यालयावर खर्च





