‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गौर अडकली लग्नबंधनात

Avika Gor | ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री अविका गौर लग्नबंधनात अडकली आहे. अविकाने तिचा प्रियकर मिलिंद चंदवानीसह लग्नगाठ बांधली आहे. दोघांनी काही महिन्यांपूर्वीच साखरपुडा केला होता. यानंतर हे कपल ‘पती पत्नी और पंगा’ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले आणि याच शोमध्ये आता दोघांचं लग्नही झालं आहे.
लग्नासाठी अविकानं लाल रंगाचा लेहेंगा त्यावर हिरव्या रंगाचे दागिने व हातात बांगड्या परिधान केल्याचं पाहायला मिळतं. तर मिलिंदनं यावेळी क्रीम कलर्चीरची शेरवानी व त्यावर गुलाबी रंगाचा फेटा परिधान केला आहे. लग्नासाठी दोघांनी शाही लूक केल्याचं पाहायला मिळालं.
View this post on Instagram
‘पती पत्नी और पंगा’च्या सेटवर काही दिवसांपासून अविका व मिलिंद यांच्या संगीत, मेहंदी व हळदीचा कार्यक्रम पार पडत होता आणि आता अखेर हे दोघे अगदी थाटामाटात याच कार्यक्रमाच्या सेटवर लग्नबंधनात अडकले. दोघांनी अगदी पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं असून, त्यांच्या लग्नाला हीना खान, रॉकी जैस्वाल,रुबिना दिलैक , ईशा मालवीय, मुनव्वर फारुकी, सोनाली बेंद्रे ही मंडळी उपस्थित होती. अविका व मिलिंद यांचं लग्न थाटामाटात पारंपरिक पद्धतीनं नॅशनल टेलिव्हिजनवर पार पडलं.
मिलिंद चंदवानी कोण आहे?
मिलिंद चंदवानीने आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. नंतर त्याने इन्फोसिसमधून करिअरला सुरुवात केली. २०१८ मध्ये त्याने कॅम्पस डायरीज या एनजीओची स्थापना केली. एमटीव्ही रोडीज शोमध्येही त्याने सहभाग घेतला होता. तो ‘कुकू एफएम’मध्ये प्रोजेक्ट मॅनेजरही होता.
हेही वाचा:
मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडली; बेंगळुरूमधील रुग्णालयात दाखल


