मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडली; बेंगळुरूमधील रुग्णालयात दाखल
Updated On:

Mallikarjun Kharge | काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
खरगे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यांना नेमका काय त्रास होत आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र त्यांना रुग्णालयात दाखल केल्याच्या माहितीनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे. Mallikarjun Kharge |
टॅग्स:



