अविका गौर 18 वर्षांनी मोठ्या अभिनेत्याला करतेय डेट; म्हणाली…

Avika Gor | अभिनेत्री अविका गौरला ‘बालिका वधू’ या टीव्ही शोमुळे लोकप्रियता मिळाली. यानंतर आता अविका तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. तिच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठ्या असलेल्या मिलिंद चांदवानीला ती डेट करत आहे. यानंतर आता अविकाने गुपचुप लग्न केल्याच्या चर्चा सुरू झाल्या असून यावर तिने खुलासा केला आहे.
पॉडकास्ट शोमध्ये भारती सिंहने अविकाला लग्नाबद्दल विचारले तेव्हा अविका म्हणाली की, ‘मी आणि मिलिंद 4 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहोत. मिलिंद आमच्या इंडस्ट्रीतला नाही. त्याची एक एनजीओही आहे. आमचं नातं सुरू झालं तेव्हा सुरुवातीचे 6 महिने आम्ही फक्त फ्रेंडझोनमध्ये होतो. आम्ही आमच्या नात्यात कधीही घाई केली नाही.’
‘फ्रेडझोनमध्ये 6 महिने राहिल्यानंतर मिलिंदने मला प्रपोज केलं. मिलिंद इतका छान आहे की मला आज तिच्याशी लग्न करावंसं वाटतं, पण मिलिंद म्हणतो की माझ्या आणि त्याच्या वयात खूप फरक आहे. त्यामुळे मी माझा पूर्ण वेळ त्यानुसार काढला पाहिजे. यानंतरच मी लग्नाचा विचार केला पाहिजे. पण मी माझ्या मनात मिलिंदशी लग्न केलं आहे,’ असेही अविकाने सांगितले.
View this post on Instagram
पुढे भारतीने विचारले, मग तू लग्न कधी करणार आहेस? यावर अभिनेत्री म्हणाली की, ‘सध्या आम्ही एकमेकांसोबत खुश आहोत आणि लग्नाला अजून वेळ आहे. याआधी अविका गौरबद्दलही या गोष्टी समोर आल्या होत्या.
अविका गौर ‘ससुराल सिमर का’ स्टार मनीष रायसिंघनला डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र दोघांनीही याला अफवा असल्याचे म्हटले. अविका ‘बालिका वधू’ सह ‘ससुराल सिमर का’ नंतर ‘उय्याला जम्पाला’, ‘एकादिकी पोथावु चिन्नावदा’ आणि ‘थँक यू’ या चित्रपटातही काम केले आहे.
हेही वाचा:





