काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Balasaheb Thorat । लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडत आहे. त्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांचाही समावेश आहे. यामध्ये जालना लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभेच्या चोथ्या टप्प्यासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी संगमनेरमधील जोर्वे गावामध्ये त्यांनी मतदान केले आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी कांचन थोरात व कन्या जयश्री थोरात यांनी देखील मतदान केलं आहे.
संगमनेरमधे सकाळपासून मतदान प्रक्रियेस सुरूवात Balasaheb Thorat ।
शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये आज चौथ्या टप्प्यात मतदान पार पडते आहे. संगमनेरमध्ये आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांना माहिती मिळावी म्हणून सूचना दर्शक फलक देखील लावण्यात आले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर आणि जालना मतदारसंघांमधील मतदार त्यांचा हक्क बजावतील. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरेल.
हे वाचलं का
रावसाहेब दानवे यांनी कुटुंबासमवेत बजावला मतदानाचा हक्क ; म्हणाले, मी चार लाख मतांनी…”
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
भाजप उमेदवार माधवी लता यांनी हैदराबादमध्ये केले ‘मतदान’
10 राज्यातील 96 जागांसाठी आज मतदान ; अखिलेश,ओवेसीसह 1717 उमेदवार रिंगणात
अभिनेता ज्युनियर एनटीआरने बजावला मतदानाचा हक्क
निलेश लंकेंनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले “ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती”
चौथ्या टप्प्याचे मदतदन सुरु ; पंतप्रधान मोदी म्हणाले,”….लोकशाही बळकट करूया!…”





