Satara | उत्पादन शुल्क प्रशिक्षण केंद्रास बाळासाहेब देसाई यांचे नाव

कोयनानगर, (वार्ताहर) – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी पाटण तालुक्यातील वाटोळे येथे स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र उभारायला शासनाने 93.34 कोटींचा निधी दिला असून या प्रशिक्षण केंद्रास लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
राज्याच्या विकासासाठी शासनाला महसुलाची आवश्यकता असून महसूल उभारणीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे या विभागाच्या सक्षमतेसाठी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणे गरचेजे आहे.
उत्पादन शुल्क विभागाचे प्रशिक्षण केंद्र वाटोळे येथे उभे करायला शासनाने मान्यता दिली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी घेतलेल्या पुढाकाराने निसर्गरम्य परिसरात हे प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे. या केंद्राच्या बांधकामासाठी शासनाने 13 मार्च 2024 रोजी 93.34 रुपये वित्तीय तरतुद केली आहे.
शंभूराज यांचा ड्रीम प्रोजेक्ट
लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी राज्याच्या विकासासाठी दिलेल्या योगदानामुळे या प्रशिक्षण केंद्रास लोकनेते बाळासाहेब देसाई असे नामांतर करण्याला शासनाने मान्यता दिली आहे.
उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असून रविवार दि. 29 रोजी या प्रशिक्षण केंद्राचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.




