Pune News : पूर्व हवेलीत बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

वाघोली : पूर्व हवेलीमध्ये पुणे महानगरपालिका आणि ग्रामीण भागामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद तसेच काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपन्न होणार असल्याने शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अनेक मान्यवरांनी बैलांची पूजा करून सोशल मीडियावर बैलांच्या मिरवणुकीचे तसेच बैलांच्या सोबत फोटो काढून शेती व शेतीसाठी मदत करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी पारंपारिक वाद्यांसोबत आधुनिक डीजेच्या गाण्यांच्या तसेच विद्युत रोषणाई मध्ये बैलांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. अनेकांनी पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढून बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
पूर्व हवेली मधील अनेक बैलगाडा शौकिनांमध्ये बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा बैलगाडा शौकिनांनी बैलगाडा मालकांनी जोपासली.





