Badrinath Dham : उद्या मंत्रोच्चाराच्या जयघोषात बद्रीनाथ धामचे कपाट होणार बंद !
Updated On:

Badrinath Dham – आगामी हिवाळ्याच्या काळामुळे प्रथेनुसार बद्रीनाथ मंदिराचे (Badrinath Dham) दरवाजे (कपाट) उद्या (दि. १९) रविवारपासून बंद होणार आहेत.
तत्पुर्वी आज पहाटे 15 क्विंटल झेंडूच्या फुलांनी आणि असंख्य दिव्यांच्या रोषणाईने हे मंदिर सजवण्यात आले होते. मंदिरात दीपावली मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली.
दिवाळी साजरी करण्यासाठी देश-विदेशातील भाविकांनी बद्रीनाथ धाम (Badrinath Dham) गाठले. त्यामुळे आजही तेथे मोठ्या रांगा लागल्या होत्या. मंदिरात आरती झाल्यानंतर भाविक दीपोत्सवात सोहळ्यात तल्लीन झाले होते. यंदा मोठ्या संख्येने भाविकांनी बद्रीनाथाच्या दर्शनाचा लाभ घेतला. ह
वाळा संपल्यानंतर हे मंदिर पुन्हा भाविकासांठी खुले केले जाते. उत्तराखंड मधील या मंदिरच्या परिसरात दरवर्षीच मोठी बर्फवृष्टी होत असते आणि त्यामुळे येथील रस्तेही बंद होत असतात.





