Asian Championships U-15 Title : भारताच्या तन्वी पात्रीला सुवर्णपदक…

Asian Championships U-15 Title (Badminton) – भारताच्याच तन्वी पात्रीने चेंगडू येथे झालेल्या १५ व १७ वर्षाखालील गटाच्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत व्हिएतनामच्या थि थू ह्युएन गुयेनला पराभूत करताना १५ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. १३ वर्षांच्या तन्वीने अवघ्या ३४ मिनिटात २२-२०, २१-११ अशी सरळ सेटमध्ये ही लढत जिंकली.
या विजेतेपदाने तन्वी थेट सामिया इमाद फारुकी (२०१७) आणि तस्नीम मीर (२०१९) यांच्या पंक्तीत समाविष्ट झाली. तन्वीने या स्पर्धेत एकहाती वर्चस्व राखताना पाचही लढतीमध्ये एकही गेममध्ये पराभव स्वीकारला नाही.
One for the history books 🥇💥
Proud of you Tanvi 🙌#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/kHiUn4Pdhx
— BAI Media (@BAI_Media) August 25, 2024
अंतिम लढतीच्या पहिल्या सेटमध्ये तन्वी १७-११ अशी पिछाडीवर होती. मात्र तन्वीने शांत राहून गुयेनला चुका करण्यास भाग पाडले. दुसऱ्या सेटमध्ये मात्र तन्वीने गुयेनला कोणतीच संधी दिली नाही. या स्पर्धेत भारताच्या ज्ञाना दत्तूने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात कांस्यपदक मिळविले होते.
US Open 2024 : भारताच्या सुमित नागलचं पुरुष एकेरीतलं आव्हान संपुष्टात….
दुसरीकडे १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत, ग्यान दत्तूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या रादिथ्या बायु वारदानाकडून त्याला ९-२१, २१-१३, २१-१३ असा पराभव पत्करावा लागला.





