Badlapur School: ‘अशा गंभीर घटनेत राजकीय पोळी भाजता…’; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ टीकेला फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर

Devendra Fadnavis । Supriya Sule । Badlapur School : बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जाते आहे. याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यलयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत.
बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात संस्थेचीसुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगण्यात आले आहे. याप्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी राजीनाम्याची मागणीकेल्याबद्दल फडणवीस म्हणाले की, “विरोधी पक्ष अशा गंभीर घटनात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात याचं दुर्देव वाटतं. संवेदना बोथट झाल्या आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असं वाटतं. अशा घटना घडतात तेव्हा राजकारण करायचं नसतं. पण यांच्या मनात केवळ राजकारण असून ते बाहेर येत आहे.
उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण करणं शोभत नाही. किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात तेव्हा मोठ्या नेत्यांनी राजकीय वागू नये. जनतेला काय दिलासा देता येईल. न्याय कसा देता येईल असं वागायचं असतं. पण सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचं आहे”. असं देखील फडणवीस म्हणाले आहेत.
सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पाहा…..





