प्रसिद्ध भारतीय सांबर मसाल्यात आढळले जीवाणू

अमेरिकेने वापस पाठवले उत्पादन
वॉशिंग्टन: भारतामधील प्रसिद्ध मसाला कंपनीचे तीन मसाले अमेरिकेतील अन्न आणि औषध प्राधिकरणाने परत पाठवले आहेत. तसेच या विभागाने सदर कंपनीच्या तीन मोठ्या ऑर्डर भारतात परत पाठवण्याचे आदेश दिले आहेत. सदर मसाल्यामधून विषबाधा होण्याची शक्‍यता असलेले साल्मोनेला जीवाणू असल्याचे या विभागाला केलेल्या चाचणीत दिसून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेतील एफडीएने या भारतीय मसाल्याच्या कंपनीला दिलेल्या नोटिशीमध्ये साल्मोनेला असलेले पदार्थ खाल्ल्यानंतर पोटदुखी, ताप येणे, अंगदुखी, उलटी आल्याची भावना येणे, तसेच जुलाब, उलट्यांचा त्रास होण्याची शक्‍यता असल्याचे सांगितले आहे.

या मसाल्याच्या चाचण्या केल्यानंतरच ते मसाले वापरात यावेत अशाही सूचना त्यांनी भारतामध्येही दिल्या आहेत. या मसाल्यामधील जीवाणूंमुळे वयोवृद्ध व्यक्‍ती तसेच लहान मुले, गरोदर स्त्रिया यांना त्रास होऊ शकतो. तसेच साल्मोनेला जीवाणूंच्या संसर्गामुळे रोगप्रतिकारशक्‍ती कमी असलेले रुग्ण आजारी पडू शकतात, असे निर्देश अमेरिकन एफडीएने दिले आहेत.

अमेरिकन एफडीएने 7 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या पत्रकामध्ये हे स्पष्ट केले आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने राज्यातही चौकशी करून मसाल्यांमध्ये अशा प्रकारचा संसर्ग असेल तर ग्राहकांना त्वरित निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारे पत्र ऑल फूड ड्रग्स लायसन्स होल्डर असोसिएशन अभय पांडे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.