Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून ‘या’ दोन जणांच्या नावाला विरोध; उमेदवारांची निवड करताना शिंदेंची कसोटी
Eknath Shinde : राज्यसभेत ज्योती वाघमारे यांच्या रुपाने नवा चेहरा दिला तोच निकष विधानपरिषदेत वापरण्याची मागणी

Eknath Shinde : राज्यातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार असून त्यादृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या वाट्याला आलेल्या नऊ जागांपैकी दोन जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे.
यासाठी शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी आठ जणांची नावे चर्चेत आहेत. यात नीलम गोऱ्हे, रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे.
यापैकी या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे विधापरिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे अंतिम करणार सांगितले जात होते. गोऱ्हे विधापरिषदेच्या माजी उपसभापती आहेत, तर बच्चू कडू यांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीला बळ मिळाल्याचे संकेत आहेत.
मात्र, आता या दोन्ही नावांना शिवसेनेच्या अंतर्गत वर्तुळातून प्रचंड विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेत ज्याप्रमाणे ज्योती वाघमारे यांच्या रुपाने नवा चेहरा देण्यात आला, तोच निकष विधानपरिषद निवडणुकीत वापरावा, अशी पक्षातील काही नेत्यांची मागणी आहे. तर बच्चू कडू यांचा शिवसेनेशी संबंध काय, असा सवाल अनेक नेत्यांनी उपस्थित केला आहे.
बच्चू कडूंसमोर एक अट ठेवा
बच्चू कडू यांना शिवसेनेकडून विधानपरिषदेची उमेदवारी द्यायचीच असेल तर त्यांच्यासमोर एक अट ठेवावी. बच्चू कडू यांना त्यांची प्रहार संघटना ही शिवसेनेत विलीन करण्यास सांगावे, असा प्रस्ताव शिवसेनेतील काही नेत्यांनी मांडला आहे. यावर दोन्ही बाजूने पुढे कोणतीही चर्चा झाली नसल्याचे कळते. Eknath Shinde
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील असंतोष दूर करत अंतिम उमेदवारांची निवड करणे त्यांच्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे कोणती रणनीती आखतात आणि कोणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
12 मे रोजी मतदान
दरम्यान, विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी येत्या 12 मे रोजी मतदान होणार असून सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल. यानंतर लगेच त्याचदिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. Eknath Shinde
हेही वाचा:





