प्रतिमांमुळे मंदिराचा दावा सिद्ध होत नसल्याचा प्रतिवाद
नवी दिल्ली : वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशीदीच्या भूभागावर उत्खननामध्ये सापडलेल्या सिंह, पक्षी आणि फुलांच्या मूर्तींबद्दल मुस्लिम पक्षांना सवोच्च न्यायलयाने मंगळवारी प्रश्न विचारले. अशा मूर्ती मशिदीमध्ये आढळतात का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर कोणत्याही मशिदीत ईश्वराची प्रतिमा सापडलेली नाही असे मुस्लिम पक्षांचे म्हणणे आहे, परंतु काही फुले व काही चित्रे सापडल्यामुळे हे स्थळ ‘अनौपचारिक’ आणि इस्लामिक मान्यतेच्या विरोधात असे म्हणता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
सिंघद्वारवरील पक्षी, सिंह आणि “कसौटी खांबा’वर सापडलेल्या काही फुलांच्या प्रतिमांमुळे येथे मशिदीऐवजी मंदिर होते या हिंदूंची बाजूचे समर्थन होऊ शकत नाही. या प्रतिमांमुळे काहीही सिद्ध होत नाही, असे वक्फ बोर्डाचे वकील ऍड. धवन यांनी सांगितले.
काही मुस्लिम साक्षीदारांनी सिंह आणि पक्षी यांच्या प्रतिमा या नवाबांचे प्रतीक असल्याचे म्हटले होते, तर काही हिंदूंनी या प्रतिमांमुळे मंदिराच्या अस्तित्वाकडे लक्ष वेधले होते. कसौटी खांबावर सापडलेल्या कमळाच्या चिन्हाने हे ठिकाण मंदिर किंवा मंदिराचा भाग बनवले नाही आणि शिवाय, अशा फुलांच्या प्रतिमा देखील जगभरातील इस्लामिक कलेचा भाग आहेत, असे ऍड. धवन यांनी सांगितले.
“कसुटी ‘खांबावर असलेली कलाकुसर आणि त्यांच्यावर सापडलेल्या विविध प्रतिमांवर धवन यांनी प्रश्न विचारला. ते म्हणाले,”काही साक्षीदारांच्या मते हे खांब तिथेच पडले होते, काहींनी ते नेपाळहून आले आणि काहींनी ते जवळच्या खाणकामातून तर काहींच्या मते ते श्रीलंकेहून आले असल्याचे सांगितले.
कासुती खांबावर, देव किंवा देवीची प्रतिमा असल्याचा कोणताही पुरावा नव्हता. हिंदूंना देवाची काही प्रतिमा दर्शवावी लागेल. तेथे कमळांच्या प्रतिमा असल्यामुळे ते एक मंदिर होते, असा दावा होतो. पण हायकोर्टाच्या निकालामध्ये असे कोणतेही निष्कर्ष नव्हते, कुतुब मीनारवर मंदिरातील शिलालेख असल्याचेही ऍड. धवन यांनी सांगितले.
प्रश्न असा आहे की अशा प्रतिमा कोणत्याही मशिदीत आहेत का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. अशा प्रतिमा संस्कृती आत्मसात केल्यामुळे असू शकते आणि बाहेरून आलेल्या धर्मांनी भारतीय धर्मांची काही वैशिष्ट्येही स्वीकारली आहेत, असेही न्यायालयाने सांगितले.