Nhavare News : बाभुळसर-करडे अष्टविनायक महामार्गावर शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Nhavare News : गैरसमजातून झालेल्या वादातून एका २८ वर्षीय शेतकऱ्याला अडवून लाकडी काठीने जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Nhavare News : एका गैरसमजातून झालेल्या वादातून तरुणाला लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केल्याची घटना करडे गावच्या हद्दीत देशमुखवस्ती परिसरात बाभुळसर ते करडे अष्टविनायक महामार्गावर घडली. या प्रकरणी शिवीगाळ, दमदाटी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी दोघांविरुद्ध शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nhavare News)
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर उमाजी सरके (वय २८, व्यवसाय शेती, रा. न्हावरा, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ही घटना २२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मौजे करडे गावच्या हद्दीतील देशमुखवस्ती येथे घडली आहे. (Nhavare News)
या प्रकरणातील आरोपी रोहन सुनील तांबे आणि ओमकार विपिन तांबे (दोघेही रा. पारगाव, शिंदेवाडी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी एका गैरसमजातून फिर्यादीला अडवून मारहाण केल्याचा आरोप आहे. (Nhavare News)
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी रोहन तांबे याने मोटारसायकलवर असलेल्या लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर, उजव्या हाताच्या कोपराजवळ तसेच डाव्या पायाच्या गुडघ्याजवळ मारहाण करून दुखापत केली. (Nhavare News)
याशिवाय, दोन्ही आरोपींनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि दमदाटी करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरुर पोलिस स्टेशनमध्ये वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बनकर करीत आहेत. (Nhavare News)
Nhavare News : शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त





