Nhavare News : शिरुर तालुक्यात दोन ठिकाणी अवैध दारु विक्रीवर पोलिसांचा छापा; मद्यसाठा जप्त
Nhavare News : शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शिरूर पोलिसांनी दोन स्वतंत्र ठिकाणी अचानक छापे टाकून अवैध देशी-विदेशी दारूसह गावठी हातभट्टीचा मद्यसाठा जप्त केला आहे.

Nhavare News : शिरुर तालुक्यात अवैध दारु विक्रीला आळा घालण्यासाठी शिरुर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकूण ९ हजार २८० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. (Nhavare News)
करडे येथे गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध, तर मांडवगण फराटा येथे विनापरवाना मद्य विक्री केल्याप्रकरणी एका पुरुषाविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवायांमुळे अवैध दारु विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (Nhavare News)
मांडवगण फराटा येथे ६७ बाटल्या जप्त…
पहिली कारवाई मांडवगण फराटा ते वडगाव रासाई डांबरी रस्त्यालगत असलेल्या ‘हॉटेल जल्लोष’ येथील पत्राशेडच्या आडोशाला २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास करण्यात आली. (Nhavare News)
मनोहर देवराम इथापे (वय ५०, रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर) हा विनापरवाना मद्यसाठा बाळगून परिचित व्यक्तींना विक्री करताना आढळला. त्याच्याकडुन एकुण ६७ बाटल्या जप्त करण्यात आल्या असुन त्याची एकुण किंमत ८ हजार ७८० रुपये आहे. (Nhavare News)
करडे येथे गावठी हातभट्टीची दारु जप्त…
करडे (ता. शिरुर) येथे २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पोलिसांनी कारवाई केली. शितल काशीनाथ बांदल (रा. करडे, ता. शिरुर) ही महिला तिच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस आडोशाला विनापरवाना गावठी हातभट्टीची तयार दारु विक्रीच्या उद्देशाने बाळगून असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच ती घटनास्थळावरुन पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. (Nhavare News)
या कारवाईत पोलिसांनी पाच लिटर गावठी हातभट्टीची तयार दारुचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम अंतर्गत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Nhavare News)
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई…
सदरच्या दोन्ही कारवाया शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले तसेच शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. (Nhavare News)
मांडवगण फराटा येथील कारवाईत पोलीस अंमलदार भाऊसाहेब शहाजी टेंगले यांनी फिर्याद दिली असून, पोलीस हवालदार एस पी खबाले तपास करत आहेत. तर करडे येथील कारवाईत पोलीस अंमलदार राजाराम शेटीबा गायकवाड यांनी फिर्याद दिली असुन पोलीस हवालदार पवार तपास करत आहेत. (Nhavare News)


