Babasaheb Purandare : “आपण आमचे जीवन समृद्ध केलेत..’ – संजय राऊत
Updated On:

मुंबई – मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ “शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’ यांचे पुण्यात आज निधन झाले.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान,बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहिली आहे. संजय राऊत म्हणाले कि…”विनम्र श्रद्धांजली… आपण आमचे जीवन समृद्ध केलेत ! महाराष्ट्र सदैव अपल्या ऋणात राहील..! या आशयाची पोस्ट राऊत यांनी केली आहे.





