PSL Funny Run Out : PSL की ‘गल्ली क्रिकेट’? चेंडू हातात असूनही फिल्डरने केली मोठी घोडचूक; VIDEO होतोय व्हायरल
PSL Funny Run Out : सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती मैदानावर घडलेल्या एका विनोदी रनआऊटच्या प्रकाराची.

PSL Funny Run Out Video Viral : पीएसएल २०२६ ( PSL) मध्ये बुधवारी कराचीमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात क्वेटा ग्लॅडिएटर्सची फलंदाजी सुरू असताना एक विचित्र प्रसंग घडला. अबरार अहमद आणि उस्मान तारिक ही जोडी क्रीजवर होती. पेशावरचा गोलंदाज अली रझा याने टाकलेला एक चेंडू कमरेच्या वर असल्याने ‘नो बॉल’ आणि ‘फ्री हिट’ देण्यात आला. अबरार अहमदने हा चेंडू बॅटने ढकलला आणि धाव नसतानाही उस्मान तारिक धावण्यासाठी निघाला.
फिल्डरची ‘मजेशीर’ फिल्डिंग –
उस्मान तारिक खेळपट्टीच्या मधोमध असताना फील्डरने चेंडू चपळाईने उचलला. यावेळी तारिकला धावबाद करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र, चेंडू थ्रो करण्याऐवजी तो फील्डर स्वतःच हातात चेंडू घेऊन स्टंपच्या दिशेने धावत सुटला. तो स्टंपपर्यंत पोहोचण्यापूर्वीच फलंदाज क्रीजमध्ये परतला. त्यानंतर घाबरलेल्या फिल्डरने नॉन-स्ट्रायकर एंडला एक दिशाहीन थ्रो केला आणि खात्रीशीर दिसणारा रनआऊट हुकला. PSL Funny Run Out
Comedy of errors in #PSL pic.twitter.com/xWnrySjlMK
— Nibraz Ramzan (@nibraz88cricket) April 15, 2026
सोशल मीडियावर ‘स्वस्तातला जोंटी रोड्स’ची चर्चा –
Sasta Jonty rodes took wrong turn 😂
— Hari Krishna (@d_hari_krishna_) April 15, 2026
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच युजर्सनी पीएसएलची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. कोणी याला ‘क्वालिटी फिल्डिंग’ म्हणून टोमणा मारला आहे, तर कोणी या खेळाडूला ‘स्वस्तातला जोंटी रोड्स’ म्हटले आहे. “असं दृश्य गल्ली क्रिकेटमध्येही पाहायला मिळत नाही,” अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. PSL Funny Run Out
बाबर आझमची निर्णायक खेळी –
सामन्याचा विचार करता, क्वेटा ग्लॅडिएटर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १५४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पेशावर झल्मीने हे लक्ष्य अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात गाठले. कर्णधार बाबर आझमने ५१ चेंडूंत नाबाद ७१ धावांची खेळी केली, ज्यामध्ये १० चौकारांचा समावेश होता. मोहम्मद हॅरिसने ३५ आणि कुसाल मेंडिसने २१ धावांचे योगदान देत संघाचा विजय सोपा केला. (PSL Funny Run Out)





