KKR Bolwer Banned : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) ने झिम्बाब्वेच्या वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानीवर दोन वर्षांची बंदी (KKR Bolwer Banned) घातली आहे. पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२६ साठी इस्लामाबाद युनायटेडशी केलेला करार मोडून तो आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघात सामील झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. वचनबद्धतेचे पालन न केल्यामुळे लीगच्या व्यावसायिक चौकटीला धक्का पोहोचतो, असे पीसीबीचे मत आहे. पीएसएलने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे की, “फ्रँचायझी-आधारित लीगमध्ये सहभाग घेणाऱ्या खेळाडूंमध्ये पारदर्शकता आणि सुसंगतता आवश्यक असते. पीएसएलसोबत करार (KKR Bolwer Banned) झालेला असताना परस्परविरोधी व्यवहारात गुंतणे हे चुकीचे आहे. अशा वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास व्यवहारांची विश्वासार्हता कमी होते आणि फ्रँचायझी, नियामक तसेच इतर हितधारकांचा व्यावसायिक व्यवहारांवरील विश्वास ढासळतो.” KKR Bolwer Banned मुझारबानीचा निर्णय मुझारबानीला आयपीएल २०२६ साठी कोलकाता नाइट रायडर्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान यांच्या जागी रिझर्व्ह खेळाडू म्हणून साइन केले होते. पीएसएलमध्ये तो इस्लामाबाद युनायटेडकडून खेळणार होता, पण आयपीएलची संधी मिळताच त्याने पीएसएलमधून माघार घेतली. पीसीबीने याला करारभंग मानले आणि कायद्याच्या माध्यमातून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली, ज्याचा परिणाम म्हणून दोन वर्षांची बंदी लागू झाली. ब्लेसिंग मुझारबानी (KKR Bolwer Banned) हा पीएसएल सोडून आयपीएलकडे वळणारा एकमेव आंतरराष्ट्रीय खेळाडू नाही. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू दासुन शनाकानेही लाहोर कलंदर्सशी केलेला पीएसएल करार सोडून आयपीएल २०२६ साठी राजस्थान रॉयल्समध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्याला सॅम कुरनच्या जागी दुखापतीमुळे रिझर्व्ह म्हणून घेण्यात आला. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉशवर पेशावर झल्मीशी करार असतानाही मुंबई इंडियन्सकडे जाण्याच्या निर्णयामुळे पीएसएलने एक वर्षाची बंदी घातली होती. गेल्या महिन्यात स्पर्धा सुरू होण्यापूर्वी जेक फ्रेझर-मॅकगर्क, गुडाकेश मोती, ऑटनील बार्टमन आणि स्पेन्सर जॉन्सन यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विविध कारणे सांगत पीएसएलमधून माघार घेतली होती. यामुळे पीएसएलसमोर खेळाडूंच्या उपलब्धतेची आणि करारांच्या विश्वासार्हतेची मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. ब्लेसिंग मुझारबानीची क्रिकेट कारकीर्द ब्लेसिंग मुझारबानी हा झिम्बाब्वेचा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. त्याने आयपीएल २०२६ मध्ये अद्याप २ सामन्यांत ४ विकेट्स घेतल्या आहेत. पीएसएलमध्ये यापूर्वी तो कराची किंग्स आणि मुलतान सुलतान्सकडून खेळला असून १५ सामन्यांत २१ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची कामगिरी प्रभावी राहिली आहे T20I: ८९ सामन्यांत १०६ विकेट्स Test : १८ सामन्यांत ६७ विकेट्स ODI: ५७ सामन्यांत ७० विकेट्स