Baba Siddique murder case : “पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे…”; छगन भुजबळ यांचा सरकारला घरचा आहेर

मुंबई – बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील आहे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
छगन भुजबळ म्हणाले, बाबा सिद्दीकी यांना अनेक वर्षांपासून मी ओळखत होतो. त्यांना धमकी देण्यात आल्यानंतर त्यांना वाय सुरक्षा सुरक्षादेण्यात आली होती. मात्र सुरक्षा देऊन काही होत नाही.
धमकी कोणी दिली होती याच्या तपास करायला पाहिजे होता. पोलीस काय करत होते?, असा सवाल करत त्यांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला.
ते असेही म्हणाले की, आमच्या भायखळा येथील तालुका प्रमुखांची देखील निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुंबई पोलिसासाठी हे एक चॅलेंज आहे.
10 /20 हजारात ही पोरं हत्या करत आहेत. ही कॉन्ट्रकट किलिंग आहे. पोलिसांना फ्री हॅन्ड दिला पाहिजे. ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्याची देखील असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.





