Abeda Inamdar invitational women’s T20 Cricket Tournament : आझम स्पोर्टस अकादमीला विजेतेपद

पुणे – आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने वॉरीयर्स संघाला ४ गडी राखून पराभूत करताना आबेदा इनामदार निमंत्रित महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या आजच्या लढतीत वॉरीयर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १३० धावा केल्या.
श्रद्धा गिरमेने दमदार फलंदाजी करताना ५३ (४९ चेंडू, ९ चौकार) धावांची खेळी केली. तिला तेजस पोळने १९ (२२ चेंडू, ३ चौकार), प्रणया पोहेकर १९ (१४ चेंडू, २ चौकार) व अदिती वाघमारे १६ (१९ चेंडू, २ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. सायली लोणकरने २ तर किरण नवगिरेने १ गडी बाद केला. आ
झम स्पोर्ट्स अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १३१ धावा करताना विजय साकारला. ऋतुजा गिलबिले ४९ धावा (३६ चेंडू, ६ चौकार) करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिला आयेशा शेख ३३ (२७ चेंडू, २ चौकार, १ षटकार), संजना शिंदेने १४ (१९ चेंडू, १ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली.
मधुरा इंगवलेने ३, ज्ञानेश्वरी पाटीलने २ तर अदिती वाघमारेने १ गडी बाद केला. स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र कॉसमॉपोलीटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामादार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे सचिव इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख, मजीद सय्यद आदी उपस्थित होते.





