IPL 2025 Ayush Mhatre injured Ruturaj Gaikwad in CSK : पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी या हंगामात आतापर्यंत काहीही चांगले घडलेले नाही. संघाला पहिल्या सामन्यानंतर सलग पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएलमध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे. या हंगामात सीएसकेची फलंदाजी ही संघासाठी सर्वात मोठी डोकेदुखी राहिली आहे. एवढेच नाही तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडलाही हंगामाच्या मध्यभागी दुखापत झाली आणि तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. आता सीएसके त्याच्या जागी मुंबईच्या युवा खेळाडूला संधी देण्यात शक्यता आहे ऋतुराज गायकवाडच्या कोपराला फ्रॅक्चर झाल्याने, तो आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामन्यातून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत, आता उर्वरित हंगामासाठी, सीएसकेने अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. गायकवाड यांच्या बदलीबाबतही बातम्या येत आहेत. त्याची जागा १७ वर्षांचा स्फोटक फलंदाज संघात घेऊ शकतो. तो १७ वर्षींय खेळाडू दुसरा-तिसरा कोणी नसून मुंबईकर आयुष म्हात्रे आहे. ज्याला आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी सीएसके ट्रायलसाठी बोलावले होते. आयुष म्हात्रे घेणार ऋतुराज गायकवाडची जागा – क्रिकबझमधील एका वृत्तानुसार, पाच वेळा आयपीएल विजेत्या संघाने जखमी ऋतुराज गायकवाडच्या जागी मुंबईच्या आयुष म्हात्रेला करारबद्ध केले आहे. अहवालात म्हटले आहे की म्हात्रेला तात्काळ फ्रँचायझीमध्ये सामील होण्यास सांगण्यात आले आहे. परंतु काही दिवसांनीच ते एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघात सामील होऊ शकतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मेगा लिलावात आयुष म्हात्रे अनसोल्ड राहिला होता. हेही वाचा – DC vs MI : बुमराह आणि नायरच्या वादाची रोहितने घेतली मजा, VIDEO होतोय व्हायरल आयुष म्हात्रेची कारकीर्द – आयुष म्हात्रेने मुंबईसाठी ९ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांनी दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. त्याने ७ लिस्ट ए सामन्यांमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले, ज्यामध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये नागालँडविरुद्ध १८१ आणि सौराष्ट्रविरुद्ध १४८ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, तो लवकरच सीएसके संघात सामील होईल, जरी त्याला लगेच संघात खेळण्याची संधी मिळेल की नाही हे स्पष्ट नाही.