Duleep Trophy 2025 : आयुष बदोनीची कमाल! द्विशतक झळकावत संघाला पोहोचवलं सेमीफानयलमध्ये

बदोनीने 223 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि 3 षटकारांच्या जोरावर 204 धावांचे नाबाद द्विशतक ठोकले. त्याच्या या खेळीच्या बळावर नॉर्थ झोनने 4 गड्यांच्या मोबदल्यात 658 धावांचा डोंगर उभा केला. त्यामुळे नॉर्थ झोनने 830 धावांहून अधिक आघाडी घेत ईस्ट झोनवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
महत्त्वाच्या भागीदाऱ्या आणि सामन्याचा लेखाजोखा –
दुसऱ्या डावात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बदोनीने प्रथम कर्णधार अंकित कुमार (321 चेंडूत 198 धावा) याच्यासह तिसऱ्या गड्यासाठी 150 धावांची भागीदारी केली. त्यानंतर निशांत सिंधू (91 चेंडूत 68 धावा) याच्यासह चौथ्या गड्यासाठी 157 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत सामना नॉर्थ झोनच्या बाजूने झुकवला. रविवारी, सामन्याच्या शेवटच्या दिवशी बदोनीच्या द्विशतकाच्या जोरावर नॉर्थ झोनने हा सामना खिशात घातला आणि सेमीफायनलमध्ये धडक मारली.
हेही वाचा – MS Dhoni : बीसीसीआय गंभीर-धोनी यांना एकत्र आणणार? माहीला टीम इंडियामध्ये मिळू शकते ‘ही’ महत्त्वाची जबाबदारी
आयुष बदोनी: आयपीएल आणि रणजी ट्रॉफीतील चमक –
Ayush Badoni struck a fine unbeaten double hundred in North Zone’s second innings against East Zone in the Duleep Trophy 👏#DuleepTrophy #AyushBadoni pic.twitter.com/kCOxIxCgLz
— Circle of Cricket (@circleofcricket) August 31, 2025
आयुष बदोनी आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो. त्याने 56 सामन्यांत 963 धावा केल्या आहेत. यंदा जानेवारी 2025 मध्येही त्याने दिल्लीकडून रणजी ट्रॉफीमध्ये रेल्वेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना नावलौकीक मिळवला होता. या सामन्यात बदोनीने दिल्लीच्या रणजी संघाचे कर्णधारपद भूषवले होते. या सामन्यात विराट कोहलीचा फलंदाजीत फारसा प्रभाव पडला नसला, तरी बदोनीच्या नेतृत्वाखाली दिल्लीने विजय मिळवला होता.
नॉर्थ झोनची सेमीफायनलमध्ये धडक –
बदोनीच्या या नाबाद द्विशतकामुळे आणि नॉर्थ झोनच्या एकूण आघाडीच्या जोरावर संघाने सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. बदोनीच्या या खेळीने त्याच्या नेतृत्व आणि फलंदाजी कौशल्याची पुन्हा एकदा चुणूक दाखवली आहे. आता सर्वांचे लक्ष नॉर्थ झोनच्या सेमीफायनलमधील कामगिरीकडे लागले आहे.
दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील सामना हा कोहलीचा व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून शेवटचा रेड-बॉल सामना ठरला कारण त्याने १२ मे २०२५ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आयुषने कोहलीच्या शेवटच्या रणजी सामन्यातही त्याच्या फलंदाजीने प्रभावित केले. त्या सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि ७७ चेंडूत ९९ धावा केल्या.





