World Athletics Championships : अविनाश साबळेचं स्वप्न भंगलं

चॅंगवॉन – भारताचा धावपटू अविनाश साबळे याला अखेर येथे सुरु असलेल्या जागतिक मैदानी स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागला, पुरुषांच्या 3000 मीटर स्टापलचेसमध्ये अंतिम फेरीत दाखल झालेल्या साबळेला चमकदार कामगिरी करण्यात अपयश आले व त्याला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
18th World Athletics championships 2022, Oregon Update ✅
🇮🇳’s @avinash3000m finishes Men’s 3000m Steeplechase final at 11th position with the time of 8:31.75
Great effort Champ 👍
Keep up the momentum!!#Athletics #IndianSports pic.twitter.com/UIlAl0CTc4— SAI Media (@Media_SAI) July 19, 2022
अविनाशने 8:31.75 असा वेळेत ही शर्यत पूर्ण केली. सुफीन अलीने 8.25.13 अशी वेळ देत सुवर्णपदकाला गवसणी घातली. गिरमा याने 8.26.01 या वेळेसह रजतपदक मिळवले. तर किप्रुटोने 8.27.92 या वेळेत ब्रॉंझपदक प्राप्त केले.
साबळे यापूर्वी 2019 सालच्या स्पर्देतही अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, त्याला तेव्हा 13 वे स्थान मिळाले होते. त्याने गेल्या महिन्यात झालेल्या डायमंड लीगमध्ये 8.12:48 वेळेसह विक्रम नोंदवला होता. या स्पर्धेत मात्र, त्याच्या पडरी निराशाच पडली.





