अवतार मेहेरबाबा जन्मोत्सव उत्साहात

नगर – अरणगाव येथे मेहेरबाबा नगरकेंद्रात अवतार मेहेरबाबा यांचा जन्मोस्तव कार्यक्रम शनिवार (दि.25) रोजी मोठ्या उत्साहात पारपडला. पहाटे 7 वाजता अवतार मेहेरबाबा की, जय म्हणून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. यावेळी अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी, उपाध्यक्ष वैभव जोशी, दीपक थाडे, राहुल मुळे, नितीन थाडे, मधुकर डाडर, सुनील मांढरे, फिरोज दमानिया, बाबादास पाखरे, वंदना काथेड, नीलिमा औटी, माधुरी मिसाळ, डॉ. प्रीती नाईक, आदीसह मोठ्या संख्नेने भाविक उपस्थित होते.
याउत्सवाचे चार दिवस आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रवचन, भजन, आरती प्रार्थना, सुगमसंगीत गायन, शास्त्रीय व भक्तीगीत गायन, पश्चिमात्य आणि इराणी बाबाप्रेमीचे गायन, वादन, अहमदनगर केंद्र व इतर बाबाप्रेमींचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, कव्वाली गायन, भजने व अभंग वाणी तसेच नृत्य कार्यक्रम होणार आहे. नगरसह देश विदेशातील भाविक दररोजच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रतिसाद मिळत आहे.
जन्मोत्सवात संतोष पाटसकर, सविता जोशी, संपदा चौधरी, सुरेखा डाडर, ऐश्वर्या थाडे, मणी दमानिया, वैशाली खेडकर, डाडर व थाडे मंडळी यांच्यासह अनेक भाविकांनी गीते, बाबाची भजने सादर केली. तर मेहेरनाथ कलचुरी यांनी बाबाच्या कार्याविषयी, त्याचा आध्यत्मिक 5 गुरुविषयी व बाबाना पाहून साईबाबानी पर्वददिगार का म्हटले याची माहिती दिली. सूत्रसंचालन दर्शना नाफडे यांनी केले.





