#AUSvPAK 2nd Test : उपहारापर्यत आॅस्ट्रेलिया १ बाद १३९

अॅडलेड : आॅस्ट्रेलिया-पाकिस्तान दरम्यान दुस-या कसोटीस अॅडलेड येथील मैदानावर आज सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी उपहारापर्यंत आॅस्ट्रेलियाने ४० षटकांत १ बाद १३९ धावसंख्येपर्यत मजल मारली आहे.
Dinner Day One!
🇦🇺 139-1#AUSvPAK
📸 @cricketcomau pic.twitter.com/C0bHCWcnyq— PCB Live Scores (@TheRealPCB_Live) November 29, 2019
आॅस्टेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांची सुरूवात खराब झाली. सलामीवीर जो बर्न्सला शाहीन आफरीदीने मोहम्मद रिजवानकरवी ०४ धावांवर बाद केले. त्यानंतर डेविड वाॅर्नर आणि मार्नस लबुशेन यांनी डाव सावरला. उपहारासाठी खेळ थांबला तेव्हा वाॅर्नर ७२ आणि लबुशेन ६० धावांवर खेळत होते.
दरम्यान, दुसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र स्वरूपात खेळवला जात आहे. दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे.





