Karanbir Singh Record : रोहित शर्माची बादशाही संपली! ऑस्ट्रियाच्या पठ्ठ्याने ५७ चेंडूंत १६४ धावा चोपत मोडला ‘हिटमॅन’चा सर्वात मोठा रेकॉर्ड
Karanbir Singh Record : करणबीर सिंगने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे.

Karanbir Singh Austria Breaks Rohit Sharma Most Sixes T20I Record : आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) त्याच्या गगनचुंबी षटकारांमुळे ‘हिटमॅन’ म्हणून ओळखले जाते. रोहितने आपल्या कारकिर्दीत षटकारांचे अनेक मोठे विक्रम प्रस्थापित केले. मात्र, आता रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक षटकारांचा जागतिक विक्रम मोडीत निघाला आहे. ऑस्ट्रिया संघाचा धडाकेबाज फलंदाज करणबीर सिंग याने हंगेरीविरुद्धच्या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस पाडत रोहित शर्माला मागे टाकले आहे.
५७ चेंडूंत १६४ धावांची वादळी खेळी; ठोकले १२ षटकार – (Karanbir Singh Record)
हंगेरीविरुद्धच्या टी-२० सामन्यात फलंदाजी करताना ३० वर्षीय करणबीर सिंगने विरोधी गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. त्याने अवघ्या ५७ चेंडूंचा सामना करत १६४ धावांची विस्मयकारक खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने १८ चौकार आणि १२ षटकार खेचले. या १२ षटकारांसह त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील एकूण षटकारांची संख्या आता २०७ वर पोहोचली आहे.
दुसरीकडे, भारताच्या रोहित शर्माच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये २०५ षटकार मारण्याचा विक्रम नोंदवलेला आहे. रोहितने २०२४ मध्येच या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केल्यामुळे तो आता करणबीर सिंगला मागे टाकू शकणार नाही. या यादीत भारताचा सूर्यकुमार यादव १७९ षटकारांसह चौथ्या स्थानावर कायम आहे.
🚨 RECORD BROKEN!
Austria skipper has gone past for the most sixes in T20I history 🔥
🏏 Karanbir Singh – 207 sixes (59 inns)
🏏 Rohit Sharma – 205 sixes (151 inns)And he did it in style — smashing a brutal 164 off just 57 balls vs Hungary 🤯💥
A new T20I six-hitting king… pic.twitter.com/SXHwhpBoq1
— Kunal Bhanwala (@bhanwala_k38130) July 3, 2026
कोण आहे करणबीर सिंग? (Karanbir Singh Record)
Karanbir Singh from Austria surpassed Rohit Sharma for most sixes in T20Is.
🇦🇹 207 – Karanbir Singh (59 inns)
🇮🇳 205 – Rohit Sharma (151)
🇦🇪 196 – Muhammad Waseem (99)
🇮🇳 179 – Suryakumar Yadav (107)
🏴 175 – Jos Buttler (143)
🇳🇿 173 – Martin Guptill (118)
🇭🇰 166 – Babar Hayat… pic.twitter.com/hruJI4VVzs— CricketGully (@thecricketgully) July 2, 2026
करणबीर सिंगने २५ मे २०२४ रोजी बेल्जियमविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत ६० सामन्यांतील ५९ डावांत ४८.७१ च्या भन्नाट सरासरीने ४ शतके आणि २० अर्धशतकांच्या मदतीने २,५३३ धावा कुटल्या आहेत.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप ५ फलंदाज: (Karanbir Singh Record)
- करणबीर सिंग (ऑस्ट्रिया) – २०७ षटकार
- रोहित शर्मा (भारत) – २०५ षटकार
- मुहम्मद वसीम (यूएई) – १९६ षटकार
- सूर्यकुमार यादव (भारत) – १७९ षटकार
- जोस बटलर (इंग्लंड) – १७५ षटकार





