Australian Open 2024 : अव्वल मानांकित इगा स्विटेकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात….

मेलबर्न – अव्वल मानांकित इगा स्विटेक शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनमधून ५० व्या मानांकित लिंडा नोस्कोव्हाकडून ३-६,६-३, ६-४ असा तिसऱ्या फेरीत पराभूत झाल्यामुळे बाहेर पडली आहे. स्विटेक ही चार वेळची ग्रॅंडस्लॅम विजेती आहे. परंतु मेलबर्न पार्क येथे ती उपांत्य फेरीपर्यंत कधीही गेलेली नाही.
दुसरीकडे, १९ वर्षीय नोस्कोव्हा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळत आहे. स्विटेकने २०२० ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन सोफिया केनिन आणि २०२२ च्या अंतिम फेरीतील डॅनिएल कॉलिन्स यांना पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पराभूत केले होते. पण, तिला तिच्या चेक प्रतिस्पर्ध्याविरुद्ध पहिला सेट घेतल्यानंतर तिला लयीसाठी झगडावे लागले.
Australian Open 2024 : रायबाकिनाचा धक्कादायक पराभव, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…
दुसऱ्या सेटच्या सातव्या गेममध्ये ब्रेकपॉइंट वाचवल्यानंतर नोस्कोव्हाने पुढील १२ पैकी ११ गुण जिंकून सामना एका सेटमध्ये बरोबरीत सोडवला. नोस्कोव्हाने पुढे आक्रमण सुरूच ठेवले आणि स्विटेकला नामोहरम केले. अखेरच्या सेटमध्ये ०-३० ने पिछाडीवर पडल्यानंतर, नोस्कोव्हाने चार गुण जिंकून ते झटपट पूर्ण केले. तिने एस मिळवत मॅच पॉइंट घेतला आणि स्विटेकने लांब फोरहँड पाठवल्यावर नोस्कोव्हाने विजयावर शिक्कामोर्तब केले.





