Australian Open 2024 : ‘नोवाक जोकोविच’चा धडाका कायम! उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक…

मेलबर्न – सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित नोवाक जोकोवीच याने येथे सुरु असलेल्या मोसमातील पहिल्याच ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत रविवारी थाटात प्रवेश केला. त्याच्यासह जेन्नीक सिन्नर व टेलर फ्रीत्झ यांनीही आगेकूच कायम राखली.
जोकोवीचने मनारीनोवर ६-०, ६-०, ६-३ अशी सरळ तिन सेटमध्ये मात केली. या विजयासह त्याने स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररच्या या स्पर्धेच्या इतिहासात सलग ३१ सामने जिंकण्याच्या कामगीरीची बरोबरीही केली.
दुसऱ्या लढतीत चेक प्रजासत्ताकच्या स्टेफानोस त्सित्सिपासला पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेचा तुलनेने नवोदित टेनिसपटू टेलर फ्रीत्झने त्सित्सिपासवर चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात ७-६, ५-७, ६-३, ६-३ असा विजय मिळवला.
Australian Open 2024 : अव्वल मानांकित इगा स्विटेकचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात….
इटलीच्या जेन्नीक सिन्नरने रशियाच्या केरेन खाशानोव्हचा ६-४, ७-५, ६-३ असा पराभव केला.
Australian Open 2024 : बालाजी-कॉर्निया पुरुष दुहेरीत पराभूत….
महिला एकेरीत बेलारूसच्या आर्यना सबालेन्काने अमेरिकेच्या आमांडा अमिसिनोव्हा व्हिक्टोरियावर ६-३, ६-२ अशी मात केली. अमेरिकेच्या कोको गॉफने पोलंडच्या मेग्देलना फ्रीचचा ६-१, ६-२ असा पराभव केला.





