WTC Final 2025 : सूर्यदेव दक्षिण आफ्रिकेला मिळवून देणार पहिली ICC ट्रॉफी? विजयासाठी मिळाले तब्बल ‘इतक्या’ धावांचे लक्ष्य

WTC Final 2025 SA vs AUS Lords Day 3 Game Kevin Pietersen Tweet : जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२५ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रोमांचक लढत होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावातही त्यांच्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला आहे. लॉर्ड्सवर खुद्द देवही दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने आहे, याचा पुरावा केव्हिन पीटरसनने ट्विट करून दिला आहे.
केव्हिन पीटरसनने शेअर केली पोस्ट –
खरं तर, केव्हिन पीटरसनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये लॉर्ड्सचे मैदान दिसत आहे, ज्यावर सूर्य पूर्णपणे चमकत आहे. पीटरसनने ट्वीट करताना लिहिले, “जर दक्षिण आफ्रिकेला २०० पेक्षा जास्त धावा करण्यासाठी परिपूर्ण हवामानाची गरज असेल, तर तो आजचा दिवस आहे. फलंदाजीसाठी उत्तम दिवस.”
If SA ever wanted the most perfect weather to get 200 odd runs to win this Test, it’s here.
A batting day…👀 pic.twitter.com/UVd0tBeoUq— Kevin Pietersen🦏 (@KP24) June 13, 2025
दक्षिण आफ्रिकेसाठी दिलासादायक बातमी –
पीटरसनने शेअर केलेला हा फोटो दक्षिण आफ्रिकेसाठी निश्चितच दिलासादायक बातमी आहे. पहिल्या दोन दिवसांपासून सातत्याने ढगाळ वातावरण होते, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून खूप मदत मिळाली. मात्र, तिसऱ्या दिवशी लॉर्ड्सवर सूर्यप्रकाश पडला आहे, ज्यामुळे मागील दोन दिवसांच्या तुलनेत फलंदाजी खूपच सोपी होईल.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य –
A formidable final-wicket partnership from Australia sets a daunting target for the Proteas to chase 🔥
Follow the action LIVE ➡️ https://t.co/pQ7yVByD1d pic.twitter.com/qZhp8Dzqsq
— ICC (@ICC) June 13, 2025
जर दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीचा फायदा घेता आला, तर संघ प्रथमच विश्व कसोटी अजिंक्यपदाचा किताब जिंकण्याचे आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. कांगारू संघाने तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत फलंदाजी करताना दुसऱ्या डावात सर्वबाद २०७ धावा केल्या आहेत. ज्यामुळे त्यांच्याकडे एकूण २८१ धावांची आघाडी झाली आहे. त्यामुळे आता दक्षिण आफ्रिका संघाला विजयासाठी २८२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
हेही वाचा – WTC Final 2025 : मिचेल स्टार्कने रचला इतिहास! डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मोडला शमीचा विक्रम
लॉर्ड्सच्या मैदानावर २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करणं अवघड –
लॉर्ड्सच्या मैदानावर चौथ्या डावात २८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे अजिबात सोपे नाही. कारण इंग्लंडच्या या ऐतिहासिक मैदानावर गेल्या २० वर्षांत फक्त एकदाच २०० पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग झाला आहे. इंग्लंडच्या संघाने २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. इंग्लिश संघाने २७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत विजय मिळवला होता.





