AUS vs SA : ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! द. आफ्रिकेचा धुव्वा उडवत नोंदवला वनडेतला दुसरा सर्वात मोठा विजय

ऑस्ट्रेलियाने सामना, तर द.आफ्रिकेने जिंकली मालिका –
या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत २ गडी गमावून ४३१ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेड (१४२), मिचेल मार्श (१००) आणि कॅमरून ग्रीन (नाबाद ११८) यांनी शतके झळकावली, तर अॅलेक्स कॅरीने नाबाद ५०धावा केल्या. विशेष म्हणजे मार्श-हेडने ऑस्ट्रेलियासाठी विक्रमी २५० धावांची रेकॉर्ड ब्रेक भागदारी साकारली, ज्यामुळे ऑस्ट्रेलिया धावांचा डोंगर उभारण्यात मदत झाली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना फक्त दोन फलंदाजांना बाद करता आले.
ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय, तर द.आफ्रिकेचा सर्वात मोठा पराभव –
The Proteas seal the ODI series in their favour while the Aussies take home the T20I series. 🏏
📸: CA/CSA#oneturfnews #ausvsa #tembabavuma #mitchellmarsh #australia #southafrica #cricket pic.twitter.com/DGALX2Bp26
— OneTurf News (@oneturf_news) August 24, 2025
प्रत्युत्तरात ४३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघ २५ षटकांत १५५ धावांतच गारद झाला. डेवॉल्ड ब्रेव्हिस (४९) आणि टोनी जॉर्जी (३३ ) यांनी काही प्रमाणात प्रतिकार केला, पण ऑस्ट्रेलियाच्या कूपर कॉनलीने ५, जेव्हियर बार्टलेट आणि शॉन अॅबट यांनी प्रत्येकी २, तर अॅडम झम्पाने १ विकेट्स घेतली. हा दक्षिण आफ्रिकेचा वनडेतला सर्वात मोठा पराभव ठरला, पण ऑस्ट्रेलिया मालिका २-१ ने गमावली.
हेही वाचा – Asia Cup 2025 : ‘…तोच संघ विजयी ठरेल’, वसीम अक्रम यांच्या वक्तव्यानंतर IND vs PAK सामन्याची उत्सुकता शिगेला
दक्षिण आफ्रिकेचे सर्वात मोठे पराभव (धावांच्या फरकाने):
- २७६ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मॅके, २०२५*
- २४३ विरुद्ध भारत, ईडन गार्डन्स, २०२३
- १८२ विरुद्ध पाकिस्तान, गकेबेरहा, २००२
- १८० विरुद्ध श्रीलंका, कोलंबो आरपीएस, २०१३
हेही वाचा – AUS vs SA : हेड-मार्श जोडीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रचला इतिहास! साकारली रेकॉर्ड ब्रेक भागीदारी
ऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय सामन्यांमधील सर्वात मोठे विजय (धावांच्या फरकाने):
- ३०९ विरुद्ध नेदरलँड्स, दिल्ली, २०२३
- २७६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मॅके, २०२५*
- २७५ विरुद्ध अफगाणिस्तान, वाका, २०१५
- २५६ विरुद्ध एनएएम, पॉचेफस्ट्रूम, २००३





