AUS Vs PAK T20 Series : पाकविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा, कर्णधारपद मात्र गुलदस्त्यात…

Australia T20I squad vs Pakistan announced : भारताविरुद्धची आगामी बॉर्डर गावस्कर मालिका डोळ्यांसमोर ठेवून, ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्ताना विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली असून या मालिकेतून नियमित कसोटी खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली असली तरी अद्याप कर्णधार कोण हे गुलदस्त्यात आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघ तीन एकदिवसीय तर तीन टी-20 सामने खेळणार आहे.
येत्या 4 नोव्हेंबरपासून या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार असून त्यानंतर दोन्ही संघ 14 नोव्हेंबरपासून टी-20 मालिका खेळतील. ही मालिका 18 नोव्हेंबरला संपल्यानंतर 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टी-20 संघाचा कर्णधार मिचेल मार्श, ट्रेव्हिस हेड व एकदिवसीय व कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स यांना विश्रांती दिली आहे.
PAK vs AUS : आगामी ODI आणि T20 मालिकेसाठी पाक संघाची घोषणा, ‘या’ स्टार खेळाडूचं पुनरागमन…
सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या संघात क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व केलेला एकाही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, ग्लेन मॅक्सवेल, ॲडम झाम्पा, मॅथ्यू शॉर्ट आणि ॲरॉन हार्डी या खेळाडूंनी यापूर्वी बिग बॅश लीगमध्ये नेतृत्व केले आहे. जोश इंग्लिस हा देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत असणार आहे. याचबरोबरीने वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेट (साइड स्ट्रेन), नॅथन एलिस (हॅमस्ट्रिंग) आणि स्पेन्सर जॉन्सन (साइड स्ट्रेन) दुखापतीतून बरे होऊन संघात परतले आहेत.
Introducing our Men’s T20I squad to take on @TheRealPCB next month 🇦🇺 🇵🇰 pic.twitter.com/5TdEF3EqMd
— Cricket Australia (@CricketAus) October 28, 2024
ऑस्ट्रेलियाचा T20 संघ : शॉन ॲबॉट, झेवियर बार्टलेट, कूपर कोनोली, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टॉइनिस, ऍडम झाम्पा.





