AUS vs PAK : पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, 35 वर्षींय दिग्गजाचे पुनरागमन…

Australia vs Pakistan ODI series 2024 : ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ पाकिस्तान विरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकदिवसीय मालिकेसाठी पॅट कमिन्सकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. वर्षभरानंतर तो कर्णधार म्हणून वनडे फॉरमॅटमध्ये परतला आहे. तर ट्रॅव्हिस हेडला वनडे संघात स्थान मिळालेले नाही.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना 8 नोव्हेंबरला तर तिसरा सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू होईल. टी-20 मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरला तर दुसरा सामना 16 नोव्हेंबरला आणि शेवटचा सामना 18 नोव्हेंबरला होणार आहे.
कमिन्सने केले 1 वर्षानंतर पुनरागमन….
विश्वचषक 2023 चे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. या स्पर्धेनंतर कमिन्स एकदिवसीय संघातून विश्रांतीवर होता. अशा परिस्थितीत आता बोर्डाने त्याचे पाकिस्तानविरुद्ध कर्णधार म्हणून पुनरागमन केले आहे. याशिवाय ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत तो दिसणार नाही. भारताविरुद्ध हेडचा रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने 2023 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले.
Our ODI squad to take on Pakistan next month is locked 🔒 pic.twitter.com/5ny05yP5gS
— Cricket Australia (@CricketAus) October 14, 2024
ऑस्ट्रेलियन संघात 35 वर्षीय अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसला या संघात स्थान देण्यात आले आहे. 2023 च्या विश्वचषकात शेवटचा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या या खेळाडूचा दुखापतग्रस्त कॅमेरून ग्रीनच्या जागी समावेश करण्यात आला आहे. स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे ग्रीनला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, कूपर कोनोली, जॅक फ्रेजर मॅकगर्क, ॲरॉन हार्डी, जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस आणि ॲडम झम्पा.





