AUS vs ENG 1st T20I : ट्रॅव्हिस हेडची झंझावती खेळी, ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर दणदणीत विजय…

AUS vs ENG 1st T20I (साउथॅम्प्टन) :- ट्रॅव्हिस हेडच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाने इंग्लंडला 28 धावांनी मात देताना तीन टी-20 लढतींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने 19.3 षटकांत 179 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड व मॅथ्यू शॉर्ट यांनी 86 धावांची सलामी दिली. मॅथ्यू शॉर्टने 4 चौकर व 2 षटकार लागवताना 41 धावांची खेळी केली. ट्रॅव्हिस हेडने 23 चेंडूत 8 चौकार व 4 षटकारांच्या साहाय्याने 59 धावा केल्या. त्याला जोश इंग्लिसने 37 धावा करताना चांगली साथ दिली. चांगली सुरुवात होऊन देखील ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजी ढेपाळली, व संघाचा डाव 179 धावांत संपुष्टात आला. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोनने 3 तर जोफ्रा आर्चर व साकिब मेहमूद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
Australia’s winning streak rolls on! #ENGvAUS @jackpayn‘s match report from Southampton: https://t.co/QmLhyRrgvm pic.twitter.com/NXiIAzpPBJ
— cricket.com.au (@cricketcomau) September 11, 2024
विजयासाठी आवश्यक असलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव 151 धावांत संपुष्टात आला. 3 गडी बाद करणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोनने फलंदाजीत देखील 37 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. फील सॉल्टने 20 तर सॅम करणने 18, जॉर्डन कॉक्सने 17 धावा करताना संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते यशस्वी झाले नाहीत. ऑस्ट्रेलिया संघाकडून शॉन ऍबॉटने 3 तर जोश हेझलवूड व ऍडम झाम्पा यांनी प्रत्येक 2 गडी बाद केले. अर्धशतकी खेळी करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Border-Gavaskar Trophy 2024/25 : भारतीय फलंदाजी हे सर्वात मोठे आव्हान – नॅथन लायन
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया : 19.3 षटकांत सर्वबाद 179 – ट्रॅव्हिस हेड 59 (8 चौकार, 4 षटकार), मॅथ्यू शॉर्ट 41 (4 चौकर, 2 षटकार), जोश इंग्लिस 37 (2 चौकार, 1 षटकार), लियाम लिव्हिंगस्टोन 3-0-22-3, जोफ्रा आर्चर 3.3-0-31-2, साकिब मेहमूद 3-0-21-2,
इंग्लंड : 19.2 षटकांत सर्वबाद 151 – लियाम लिव्हिंगस्टोन 37 (4 चौकार, 1 षटकार), फील सॉल्ट 20 (4 चौकार), सॅम करण 18 (2 चौकार), जॉर्डन कॉक्स 17 (3 चौकार) शॉन ऍबॉट 3.2-0-28-3, जोश हेझलवूड 4-0-32-2 ऍडम झाम्पा 4-0-20-2. सामनावीर – ट्रॅव्हिस हेड





