AUS vs AFG : वरुणराजा पावला ! ऑस्ट्रेलियाची सेमीफायनमध्ये धडक; अफगाणिस्तानचे काय होणार?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना खेळवण्यात आला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे दोन्ही संघाला नियमाप्रमाणे १ -१ गुण देण्यात आले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने थेट सेमी फायनलमध्ये धडक मारली. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे सेमी फायनलचे गणित थोडे किचकट बनले आहे.
अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला सामना जिंकण्यासाठी २७४ धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १२.५ षटकांत एका गडी गमावून १०९ धावा केल्या. त्यानंतर पाऊस आणि ओल्या मैदानामुळे खेळ होऊ शकला नाही.सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियन संघ चार गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचला.
अफगाणिस्तानचे सेमीफायनलचे समीकरण
अफगाणिस्तान संघाचे आता तीन गुण झाले आहेत. शनिवारी (1 मार्च) इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने हरवले तरच अफगाणिस्तान संघ सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतो. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला हरवले तर अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेचे ३-३ गुण असतील आणि उपांत्य फेरीतील संघ नेट-रन रेटच्या आधारे निश्चित केला जाईल.
नेट-रन रेट
या स्पर्धेतील सर्व संघांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा नेट-रन रेट (+२.१४०) सर्वोत्तम आहे. अफगाणिस्तानचा नेट-रन रेट ( -0.990) आहे. जर इंग्लडच्या संघाने 207 धावांनी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला किंवा दक्षिण आफ्रिकेने दिलेले टार्गेट जर इंग्लडने ११. १ ओव्हर मध्ये पूर्ण केले तर अफगाणिस्तान सेमी फायनलमध्ये धडक मारू शकतो. मात्र सध्याचे समीकरण बघितले तर हे जरा अवघड आहे त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा सेमी फायनलमधील प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे.





